*नंदुरबार जिल्हा प्रशासनाचा ऐतिहासिक निर्णय, शिक्षक परिषदेच्या लढ्याला मोठे यश! मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्याकडून 'एकस्तर वेतनश्रेणी' चे आदेश निर्गमित 20 प्रलंबित प्रश्नांवर वि
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्हा प्रशासनाचा ऐतिहासिक निर्णय, शिक्षक परिषदेच्या लढ्याला मोठे यश! मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्याकडून 'एकस्तर वेतनश्रेणी' चे आदेश निर्गमित 20 प्रलंबित प्रश्नांवर वि
*नंदुरबार जिल्हा प्रशासनाचा ऐतिहासिक निर्णय, शिक्षक परिषदेच्या लढ्याला मोठे यश! मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्याकडून 'एकस्तर वेतनश्रेणी' चे आदेश निर्गमित 20 प्रलंबित प्रश्नांवर विजयाची मोहोर*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) जिल्हा शाखा नंदुरबार यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. जिल्हा प्रशासनाने सकारात्मक पावले उचलत, पेसा व आदिवासी क्षेत्रातील शिक्षकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असा 'एकस्तर' पदोन्नती वेतनश्रेणीचा (S-14) आदेश 23 डिसेंबर रोजी निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शिक्षकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून, शिक्षक परिषदेने 27 डिसेंबर रोजीचे नियोजित धरणे आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे.
राजकीय व प्रशासकीय वज्रमुठ
शिक्षक परिषदेच्या या आंदोलनाला भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी, आमदार राजेश पाडवी आणि शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी पत्राद्वारे खंबीर पाठिंबा दर्शवला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेऊन 20 डिसेंबर रोजी विशेष व्हिसी (VC) द्वारे आढावा घेतला. यानंतर आज शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत अधिकृत आदेश निर्गमित करण्यात आले. महत्त्वाचे निर्णय व फलश्रुती,
एकस्तर पदोन्नती, आदिवासी क्षेत्रातील शिक्षकांसाठी मुख्याध्यापक पदाची S-14 (38600-122800) वेतनश्रेणी लागू. शासन निर्णयाविपरीत झालेली वसुली तात्काळ थांबवण्याचे आदेश.
वस्तीशाळा शिक्षक: 17 शिक्षकांच्या वेतनश्रेणी प्रस्तावांची एका आठवड्यात पडताळणी होणार.
DCPS/PRAN, शिक्षकांच्या कपातीची रक्कम 3 आठवड्यांत खात्यात जमा होणार. वैद्यकीय देयके: प्रशासकीय दिरंगाई टाळण्यासाठी दोन टप्पे कमी करून प्रक्रिया सुलभ केली. पेन्शन प्रकरणे: मयत शिक्षकांची सर्व 32 प्रकरणे मंजूर करण्यात आली असून जिल्हा स्तरावर एकही प्रकरण प्रलंबित नाही. बोगस दिव्यांग: दोषी कर्मचाऱ्यावर विभागीय चौकशीनंतर अंतिम शिक्षेची कारवाई सुरू. आंदोलन स्थगिती व कृतज्ञता:
प्रशासनाने निवेदनाची दखल घेऊन प्रत्यक्ष आदेश निर्गमित केल्यामुळे 27 डिसेंबरचे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे जिल्हा शाखेने जाहीर केले. या यशासाठी शिक्षक परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण देवरे, शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे आणि आस्थापना विभागाचे जाधव यांचे आभार मानले आहेत. यावेळी शिक्षक परिषदेचे प्रांत कार्यवा पुरुषोत्तम काळे, प्रांत सहकार्यवाह राकेश आव्हाड, विभागाचे उपाध्यक्ष किरण घरटे, जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी, जिल्हा सहकार्यवाह बाळासाहेब जावरे, तालुकाध्यक्ष अरुण गवळी, शहादा तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा पदाधिकारी व शिष्टमंडळ उपस्थित होते. "शिक्षण आणि शिक्षक हितासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत," असा विश्वास जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी यांनी व्यक्त केला आहे.



