*जिल्हा परिषद केंद्र शाळा पळशी येथे ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हा परिषद केंद्र शाळा पळशी येथे ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न*
*जिल्हा परिषद केंद्र शाळा पळशी येथे ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा परिषद केंद्र शाळा पळशी येथे महाराष्ट्र शासनाच्या आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन पळशी केंद्राचे केंद्रप्रमुख के. डी. सूर्यवंशी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या प्रसंगी सरपंच भालेराव कोकणी, उपसरपंच संतोष गवळी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते कनीलाल कोकणी, बकाराम भिल, योगेश गावित, राजेंद्र साबळे, ओम चेतन कोकणी तसेच केंद्र मुख्याध्यापिका श्रीमती सरिता साबळे, उपशिक्षक पुरुषोत्तम काळे, श्रीमती सुलोचना वळवी व ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, विद्यार्थ्यांना व्यावसायिक व व्यावहारिक ज्ञान, हसत-खेळत आनंददायी शिक्षण मिळावे या उद्देशाने या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे केंद्रप्रमुख के. डी. सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात सांगितले व उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. सरपंच भालेराव कोकणी व उपसरपंच संतोष गवळी यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच गेल्या अनेक वर्षापासून विविध उपक्रम राबवणाऱ्या केंद्र मुख्याध्यापिका श्रीमती सरिता साबळे यांचे देखील अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या बाल आनंद मेळाव्यात शाळेतील एकूण 35 विद्यार्थ्यांनी 35 विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले होते. यामध्ये खमन, इडली-चटणी, गुलाबजाम, चना उसळ, मटकी उसळ, पाववडा, मूग भजी, कांदा भजी, पात्रा भजी, खिचडी, पाणीपुरी, शंकरपाळे, बटाटा पोंगे, पुरी-भाजी, गाजर हलवा, बोरे, संत्री, शेंगदाणे, लाडू, पेढे आदी पदार्थांचा समावेश होता, गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांकडून खरेदी करून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. महिला, युवक- युवती व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मेळाव्याचा आनंद लुटला. उपस्थित मान्यवरांनीही विद्यार्थ्यांकडून पदार्थ खरेदी करून त्यांचे कौतुक केले.
दरवर्षी संपन्न होणाऱ्या या बाल आनंद मेळाव्याला प्रतिवर्षी भव्य व दिव्य स्वरूप प्राप्त होत असून, यंदाही पालकांचा सहभाग उल्लेखनीय ठरला. पालकांच्या सहकार्याशिवाय कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही, म्हणून पालकांचे विशेष कौतुक करून शाळेच्या विकासासाठी लोकसभा करण्याचे आवाहन करीत केंद्र मुख्याध्यापिका श्रीमती सरिता साबळे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन उपशिक्षक पुरुषोत्तम काळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज कोकणी, तनुजा कोकणी, श्रीमती लक्ष्मी कोकणी, अनिता साबळे आदींचे अनमोल सहकार्य लाभले.



