*प्रा. डॉ. अनिल साळुंके लिखित तुलनात्मक राज्यशास्त्र व राजकीय विचारप्रणाली या पुस्तकांचे प्रकाशन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*प्रा. डॉ. अनिल साळुंके लिखित तुलनात्मक राज्यशास्त्र व राजकीय विचारप्रणाली या पुस्तकांचे प्रकाशन*
*प्रा. डॉ. अनिल साळुंके लिखित तुलनात्मक राज्यशास्त्र व राजकीय विचारप्रणाली या पुस्तकांचे प्रकाशन*
शहादा(प्रतिनिधी):-राज्यशास्त्र विषयाचे अभ्यासक प्रा. डॉ. अनिल साळुंके लिखित तुलनात्मक राजकारण प्रणाली आणि प्रक्रिया (COMPARATIVE POLITICS Systems and Processes) व राजकीय विचारप्रणाली एक परिचय (POLITICAL IDEOLOGIES An Introduction) या पुस्तकाचे प्रकाशन कथा वाचक ह. भ. प. आचार्य अनिल शर्मा, प्रा. संजय जाधव, वर्षा जाधव, ॲड. राजेश कुलकर्णी, प्रविणा कुलकर्णी व भरत अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले संत सेना नवरात्र उत्सव मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन संत सेना चौक येथे करण्यात आले आहे, सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला व विज्ञान महिला महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयाचे अभ्यासक प्राध्यापक तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य असलेले प्रा डॉ. अनिल साळुंके यांनी स्पर्धा परीक्षा व राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी लिहिलेल्या तुलनात्मक राजकारण प्रणाली आणि प्रक्रिया (COMPARATIVE POLITICS Systems and Processes) हे अमेरिका, ब्रिटन, रशिया चीन, व भारत आदी देशांचे संविधान व राजकारण यांच्या तुलनात्मक पद्धतीने अभ्यासपूर्ण लेखन केले आहे ते सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रेमचंद जाधव व सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा आशा जाधव यांना समर्पित केले आहे तसेच राजकीय विचारप्रणाली एक परिचय (POLITICAL IDEOLOGIES An Introduction) या पुस्तकात उदारमतवाद, समाजवाद, मार्क्सवाद, राष्ट्रवाद, स्त्रीवाद, फॅसिझम, नाझीझम, पर्यावरणवाद, लोकशाही, जागतिकीकरण आदी जागतिक पातळीवर विचार प्रणाली यावर विशेष भर देणारे पुस्तक लिहिले असून ते त्यांनी आपली आई स्व. विमलबाई सोलंकी व वडील काशिनाथ सोलंकी यांना समर्पित केले असून ते पॅराडॉक्स इंटरनॅशनल पब्लिकेशन्स आणि सॅन इंटरनॅशनल सायंटिफिक पब्लिकेशन्स प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. या पुस्तक प्रकाशन समारंभाच्या प्रसंगी कथा वाचक ह. भ. प. आचार्य अनिल शर्मा महाराज, सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. संजय जाधव व सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव वर्षा जाधव, व्हॉलंटरी प्राथमिक महिला मंडळ शाळेचे सचिव, सरकारी अभियोक्ता ॲड. राजेश कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्त्या प्रवीणा कुलकर्णी , सामाजिक कार्यकर्ते भरत अग्रवाल, लेखक प्रा. डॉ. अनिल साळुंके, कैलास सोलंकी, गायत्री सोलंकी, राजेश राठोड, रचित सोलंकी यांच्या हस्ते वरील दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी रसिक श्रोते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी आचार्य अनिल शर्मा महाराज यांनी' पुस्तक हे मनुष्याला दीपस्तंभारखे सतत मार्गदर्शन करीत असल्याने ज्ञान प्राप्त होते. पुस्तक हे आपले खरे मित्र असून त्यांच्याशी मैत्री केली पाहिजे, लेखकाला ज्यांनी जन्म दिला ते आई व वडील तसेच पालनकर्ता संस्थाचालकांना समर्पित केले असून ज्या गल्लीत लेखक लहानाचे मोठे झाले, घडले त्याच ठिकाणी, व संत सेना नवरात्र उत्सव मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने श्रीमद् देवी भागवत ज्ञान कथा सप्ताह प्रसंगी हे पुस्तक प्रकाशन होत असल्याचा दुर्मिळ योग असून त्याचा करतांना मनस्वी आनंद होत आहे,' असे प्रतिपादन केले.
याशिवाय प्रा. संजय जाधव, ॲड. राजेश कुलकर्णी व लेखक प्रा. डॉ. अनिल साळुंके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल सोलंकी, सूत्रसंचालन गायत्री सोलंकी तर आभार लक्ष्मण पटेल यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संत सेना नवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.



