*जि प गुजरभवाली शाळेत 'बाल आनंद मेळावा' उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जि प गुजरभवाली शाळेत 'बाल आनंद मेळावा' उत्साहात संपन्न*
*जि प गुजरभवाली शाळेत 'बाल आनंद मेळावा' उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-"चला खेळूया, चला डुलूया, आनंदाच्या लाटांवर स्वार होऊया!" या उक्तीप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुजर भवाली (केंद्र: सुंदरदे) येथे 20 डिसेंबर 2025 रोजी 'बाल आनंद मेळावा' अत्यंत उत्साही आणि आनंददायी वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना व्यावसायिक अनुभव मिळावा, या उद्देशाने आयोजित या मेळाव्याला ग्रामस्थ आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
लोकसहभागातून शाळेला मदतीचा हात या मेळाव्याचे औचित्य साधून शाळेच्या प्रगतीसाठी मान्यवरांनी सढळ हाताने मदत केली.
रवी बाविस्कर सामाजिक कार्यकर्ते यांनी शाळेसाठी 15000 रुपये किमतीची सोलर बॅटरी आणि स्वच्छतागृहाच्या देखभालीसाठी 11000 रुपये रोख देणगी दिली. सरला नाईक मुख्याध्यापिका यांनी शाळेला Microtech Inverter आणि 5001 रुपये रोख देणगी स्वरूपात देऊन आपला सामाजिक वारसा जपला. 60 स्टॉल्स आणि खाद्यान्न मेजवानी
मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी थाटलेले 60 विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स होते. यात घरगुती रुचकर पदार्थांसोबतच 'रानमेवा' आणि ताज्या भाजीपाल्याचीही विक्री करण्यात आली. उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन खाद्यनगरीचा आस्वाद घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना हिशोब ठेवणे, संवाद साधणे आणि व्यावसायिक कौशल्य आत्मसात करण्याचा अनुभव मिळाला.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रप्रमुख एल. जी. देसले यांच्या हस्ते झाले. यावेळी नळवा शाळेच्या मुख्याध्यापिका आरती बाविस्कर, सामाजिक कार्यकर्ते रवी बाविस्कर, सरपंच रीना गोविंद नाईक, उपसरपंच प्रकाश गावित, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक गावित, माजी अध्यक्ष अमोल गावित, माध्यमिक विद्यालयाचे वळवी सर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सांस्कृतिक आणि मनोरंजनाची रेलचेल
खाद्यपदार्थांसोबतच विद्यार्थ्यांनी विविध मनोरंजक खेळ, बाल साहित्य आणि सांस्कृतिक आविष्कारांचे सादरीकरण केले. चिमुकल्यांच्या कलागुणांनी मेळाव्यात अधिकच रंग भरले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सरला नाईक, सर्व शिक्षक वृंद, शालेय व्यवस्थापन समिती आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि आनंद पाहून पालकांनी शाळेच्या या उपक्रमाचे मोठे कौतुक केले.



