*नंदुरबारच्या शासकीय कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांचे शेतकर्यांना मार्गदर्शन, रावे कार्यक्रमांतर्गत कैटपाडा गावात कृषि सर्वेक्षणाला सुरुवात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबारच्या शासकीय कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांचे शेतकर्यांना मार्गदर्शन, रावे कार्यक्रमांतर्गत कैटपाडा गावात कृषि सर्वेक्षणाला सुरुवात*
*नंदुरबारच्या शासकीय कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांचे शेतकर्यांना मार्गदर्शन, रावे कार्यक्रमांतर्गत कैटपाडा गावात कृषि सर्वेक्षणाला सुरुवात*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्यांनी कैटपाडा (ता.साक्री) गावाला भेट देवून रावे कार्यक्रमांतर्गत कृषी सर्वेक्षणाला सुरुवात केली. शेतकर्यांशी संवाद साधत आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पिक व्यवस्थापन या विषयावर कृषीकन्यांनी मार्गदर्शन केले.
नंदुरबार शहरातील शासकीय कृषी महाविद्यालयातर्फे अंतिम वर्षाच्या विद्यार्थीनी असलेल्या कृषीकन्यांचे ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषी औद्योगिक संलग्न कार्यक्रमांतर्गत साक्री तालुक्यातील कैटपाडा गावास भेट दिली. कृषीकन्यांनी रावे कार्यक्रमांतर्गत कृषी सर्वेक्षणाला सुरुवात केली. या सर्वेक्षणाद्वारे विद्यार्थीनी कैटपाडा गावातील शेती आणि शेतकर्यांच्या समस्यांची माहिती गोळा करीत आहेत. तसेच कृषिकन्या एआयए कार्यक्रमही राबवत असून शेतकर्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. आधुनिक कृषि तंत्रज्ञान, पिक व्यवस्थापन, मृदा आरोग्य आणि कीड नियंत्रण यांसारख्या महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन कृषीकन्यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सरपंच बेबीबाई पवार, उपसरपंच रोहिदास पवार, ग्रामसेवक दिपक जाधव, ग्रा.पं. सदस्य यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमात स्नेहा जगन्नाथ ठाकरे, मनिषा दत्तू चौरे, सेजल रविंद्र पवार, वैष्णवी हंसराज फरदे, प्रतिक्षा भरत गवळी या कृषिकन्यांचा समावेश आहे. कार्यक्रमासाठी नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.यु.बी.होले, रावेचे अध्यक्ष प्रा.एस.डी. पाटोळे, समन्वयक डॉ.डी.बी.सूर्यवंशी, कार्यक्रम अधिकारी डॉ.बी.एस.गुंजाळ यांचे कृषीकन्यांना मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यींना ग्रामीण भागातील गरजांचे प्रत्यक्ष माहिती मिळून कैटपाडा गावातील शेतीत सकारात्मक बदल घडेल, अशी अपेक्षा महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापकांनी व्यक्त केली आहे.



