*डी आर हायस्कूल येथे आनंद मेळावा उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डी आर हायस्कूल येथे आनंद मेळावा उत्साहात संपन्न*
*डी आर हायस्कूल येथे आनंद मेळावा उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल येथे आनंद मेळावा संपन्न झाला. या आनंद मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे कार्यकारिणी सदस्य तसेच शाळेचे उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मोहन अहिरराव, पर्यवेक्षक हेमंत खैरनार, पर्यवेक्षक संजय सैंदाणे व सर्व शिक्षक सहकारी उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञान, व्यावसायिक कौशल्य, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता वाढवण्यासाठी आनंद मेळावा आयोजित केला जातो, ज्यात विद्यार्थी स्वतः खाद्यपदार्थांचे आणि वस्तूंचे स्टॉल्स लावतात, विक्री करतात आणि यातून त्यांना प्रत्यक्ष आर्थिक बाबींची जाणीव होते, ज्यामुळे त्यांना निखळ आनंद मिळतो आणि शैक्षणिक शिक्षणासोबतच व्यावहारिक शिक्षणाचे धडे
मिळतात विद्यार्थी वयात श्रमाचे महत्व, व्यवहार ज्ञान, कळावे, विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन व श्रममूल्य हे कौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने स्काऊट विषयांतर्गत खरी कमाई हा उपक्रम राबवला जातो. आनंद मेळाव्यांतर्गत स्काऊट विद्यार्थ्यांनी खरी कमाई उपक्रमाचा प्रत्यक्षात अनुभव घेतला. विभाग प्रमुख राजेंद्र लांडगे सह सर्व स्काऊट शिक्षकांनी यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील समिती प्रमुख योगेशकुमार गवते तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



