*पियुष सिंह,अतिरिक्त सचिव, ऊर्जा मंत्रालय,भारत सरकार यांची कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबारला भेट, प्रयोगशील शेतकऱ्यांशी साधला संवाद*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पियुष सिंह,अतिरिक्त सचिव, ऊर्जा मंत्रालय,भारत सरकार यांची कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबारला भेट, प्रयोगशील शेतकऱ्यांशी साधला संवाद*
*पियुष सिंह,अतिरिक्त सचिव, ऊर्जा मंत्रालय,भारत सरकार यांची कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबारला भेट, प्रयोगशील शेतकऱ्यांशी साधला संवाद*
नंदूरबार(प्रतिनिधी):-डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे पियुष सिंह, अतिरिक्त सचिव, ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार यांनी भेट दिली. यावेळी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, नमन गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार, नियोजन अधिकारी शशांक काळे, डॉ. हेडगेवार सेवा समितीचे कोषाध्यक्ष कृष्णा गांधी, आत्माचे प्रकल्प संचालक दिपक पटेल, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबारचे प्रमुख शास्त्रज्ञ राजेंद्र दहातोंडे आणि सर्व शास्त्रज्ञ यांची उपस्थिती होती. या भेटीदरम्यान कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबारच्या प्रक्षेत्रावरील परसबाग, बोअरवेल पुनर्भरण, पपई लागवड तंत्रज्ञान, कापूस पिकातील नवनवीन तंत्रज्ञान, नैसर्गिक शेतीचे प्रात्यक्षिके, कांदा बीज उत्पादन यांना भेटी दिल्या. यावेळी कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे सिलेज प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या कृषक ज्ञान विज्ञान मंडपम मधील भेटीत एकात्मिक शेती पद्धती, भूमिसुपोषण, बियाणे संवर्धन, रेशीम शेटी, मधुमक्षिका पालन, सुधारित अवजारे, जैविक कीड नियंत्रणाच्या पद्धती यातील विविध तंत्रज्ञानाची माहिती घेतली. यावेळी कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार येथील सर्व शास्त्रज्ञांनी तपशीलवार माहिती दिली. माती आणि पाणी परीक्षण प्रयोगशाळा भेट दिली. वुमन्स टेक्नॉलॉजी पार्कमध्ये ग्रामीण स्तरावर करता येण्याजोग्या विविध उद्योग व्यवसायांची माहिती त्यांनी घेतली आणि उद्योगाला चालना देण्याचे आवाहन केले. कृषि विज्ञान केंद्र मार्फत चालू असलेल्या विविध प्रयोगाची दखल घेत ट्रॅक्टर, बैलचलित आणि मनुष्यचलित अवजारांबद्दलही माहिती जाणून घेतली. यावेळी शेतकरी संवादाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी संवाद कार्यक्रमात पियुष सिंग यांनी पोषक तृणधान्याचे महत्व सांगून तृणधान्याच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी प्रशिक्षणाचा चांगला उपयोग करून बचत गटाच्या माध्यमातून तृणधान्याच्या बेकरी पदार्थांचि निर्मिती आणि विक्री व्यवस्थापन करावे असे आवाहन केले.
या शेतकरी संवादात कांतीलाल नाईक बोरचेक यांनी नेसू नदीवरील पाण्याचे प्रयोग आणि नेसू नदी पूजन याविषयी माहिती दिली. सोनपाडा येथील मानसिंग वळवी यांनी दाल मिल संबंधीचे अनुभव व्यक्त केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रीसर्च, हैदराबाद येथे प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. प्रशिक्षणातील अनुभव सौ रमिला वसावे, सौ.रिता पाडवी, सौ सुनंदा पाडवी या प्रशिक्षणार्थ्यांनी मांडले. क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने चालविल्या जाणाऱ्या पशु आरोग्य रक्षक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र पशु आरोग्य रक्षकांना देण्यात आले.



