*मिशन हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे उत्साहात आयोजन:चिमुकल्या शास्त्रज्ञांच्या कल्पकतेने सर्व थक्क*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मिशन हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे उत्साहात आयोजन:चिमुकल्या शास्त्रज्ञांच्या कल्पकतेने सर्व थक्क*
*मिशन हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे उत्साहात आयोजन:चिमुकल्या शास्त्रज्ञांच्या कल्पकतेने सर्व थक्क*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथील मिशन हायस्कूलमध्ये वार्षिक विज्ञान प्रदर्शनाचे अतिशय भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांनी आणि वैज्ञानिक मॉडेल्सनी उपस्थितांची मने जिंकली.यावेळी उपशिक्षणाधिकारी डॉ.निलेश लोहकरे यांनी वेद कापून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. व्यासपीठावर शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी उपप्राचार्य विजय पवार, पर्यवेक्षिका वंदना जांबीलसा, पर्यवेक्षक मीनलकुमार वळवी आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमास शुभेच्छा देताना डॉ. निलेश लोहकरे यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, नंदुरबार येथील विद्यार्थी राष्ट्रीयस्तरापर्यंत जावेत व नंदुरबार मधूनही शास्त्रज्ञ तयार व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा हा या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे असे म्हटले की, प्रदर्शनातील मुख्य आकर्षणे या प्रदर्शनात इयत्ता 5 वी ते 12 वीच्या 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये प्रामुख्याने खालील विषयांवर आधारित 75 प्रकल्प सादर करण्यात आले, यामध्ये शालेय विज्ञान प्रदर्शनामध्ये हायड्रोपोनिक शेती, कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकला पर्याय, हरित ऊर्जा, उद्योनमुख तंत्रज्ञान, मनोरंजक गणितीय मॉडलिंग, आरोग्य आणि स्वच्छता, जलसंवर्धन आणि व्यवस्थापन तसेच "रोबोफेस्ट" अंतर्गत ऑफस्ट्रॅकल अवॉइंडिंग रोबो कार, स्पायडर रोबोट, पल्स रेट मॉनिटरिंग सिस्टीम, टोल गेट वेहिकल बॅरियर, वूमन सेफ्टी प्रोजेक्ट असे अनेक प्रकल्प विद्यार्थ्यां मार्फत सादर करण्यात आले, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग केवळ प्रकल्प मांडून न थांबता, विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रयोगाची माहिती अत्यंत आत्मविश्वासाने प्रमुख पाहुणे व परीक्षकांना समोर सादर केली. यावेळी इ. 5 ते 8 वी च्या गटाचे तज्ज्ञ परीक्षक प्रा. प्रियंका वळवी, प्रा. चंद्रकांत निकम, प्रा. प्रशांत पाटील तर 9 ते 12 वी या गटाचे प्रा.दीपक शिंपी, प्रा.संजोक्ता गिरासे, प्रा.प्रतीक्षा वळवी, प्रा. पल्लवी पोळ यांनी सर्व प्रकल्पांचे बारकाईने निरीक्षण केले. कल्पकता, मांडणी आणि सादरीकरण या निकषांवरून विजेत्यांची निवड करण्यात आली. प्रदर्शनाच्या शेवटी विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
आजचे विद्यार्थी हे उद्याचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या या छोट्या प्रयोगांमधूनच भविष्यातील मोठे शोध लागतील," असे गौरवोद्गार प्रदर्शनाला भेट देणाऱ्या पालकांनी काढले. या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रती ओढ निर्माण झाली असून, संपूर्ण परिसरात एस.ए. मिशन हायस्कूलच्या य उपक्रमाचे कौतुक होत आहे. या वार्षिक विज्ञान प्रदर्शनासाठी शाळेतील सर्व विज्ञान शिक्षकांनी तसेच प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.



