*सोरापाडा येथे रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा सिद्ध पादुका दर्शन सोहळा उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सोरापाडा येथे रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा सिद्ध पादुका दर्शन सोहळा उत्साहात संपन्न*
*सोरापाडा येथे रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा सिद्ध पादुका दर्शन सोहळा उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे रामानंदाचार्य संप्रदायातर्फे आयोजित जगद्गुरू श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या सिद्ध पादुका दर्शनाचा सोहळा मोठ्या हर्षोउल्हासात पार पडला. सर्वप्रथम पोलीस स्टेशन अक्कलकुवा येथून रथावरून जगद्गुरूश्रींच्या सिद्ध पादुकांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदार आमशा पाडवी यांच्याहस्ते सिद्ध पादुकांचे पूजन व आरती करण्यात आली. यावेळी भाविकांच्या उपस्थितीत सोरापाडा येथील कालिका देवीच्या मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी येथील आदिवासी बंधू- भगिनींनी पारंपारिक वेशभूषेत तसेच पारंपारिक वाद्यांच्या गजरात अतिशय शिस्तबद्ध रीतीने नृत्य सादर करीत व जगद्गुरूश्रींच्या जयघोषात मिरवणुकीत सहभाग नोंदविला. भाविकांच्या हर्षोल्हासात संपूर्ण शहराचे वातावरण भक्तिमय झाले.
कालिका माता मंदिरातील आगमनानंतर प्रवेशद्वारावर जगद्गुरूश्रींच्या पादुकांचे पूजन करण्यात येवून व्यासपीठाकडे आगमन झाले. व्यासपीठावरील जगद्गुरूश्रींच्या सिद्ध पादुकांच्या आगमनानंतर पादुका पूजन आरती करण्यात आली. यावेळी अक्कलकुवा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक चव्हाण, श्रीम. आशा पाडवी, माजी जी प सभापती शंकर पाडवी, श्रीम. उषा बोरा (सरपंच, अक्कलकुवा), तसेच कालिका माता मंदिर ट्रस्टी पृथ्विसिंग पाडवी, किशोर हिरे, उतर महाराष्ट्र उपपीठ रामशेज व्यवस्थापक पद्माकरजी केदासे, नितीन शेळके, प्रभारी महिला प्रमुख श्रीम. संगीता वाळके, प्राचार्य जितेंद्र सोनवणे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सामाजिक उपक्रमांतर्गत स्थानिक गरजू शेतकऱ्यांना कृषी फवारणी पंपांचे वितरण करण्यात आले. यानंतर जगद्गुरूश्रींच्या पादुकांचे पूजनसाठी भाग्य चिठ्ठी काढण्यात आली त्यात देविदास पाटील व त्यांच्या धर्मपत्री यांना जगद्गुरूश्रींच्या पादुकांचे पूजनाचा मान मिळाला. जगद्गुरूश्रींच्या पादुकांचे पूजन विधीपूर्वक देविदास पाटील व त्यांच्या धर्मपत्री यांच्या हस्ते करण्यात आले तसेच इतर सेवेकरी भाविकांनी देखील मंडपात बसून पूजनाचा लाभ घेतला. यानंतर उपासक दीक्षेसाठी आलेल्या 92 भाविकांना दीक्षा देण्यात आली. दिक्षेनंतर माउलींच्या भक्तीगजरात उपस्थित भाविकांनी नृत्याचा आनंद घेतला. शेवटी उत्तर पूजा व आरती संपन्न झाली. या भक्तिमय वातावरणात सर्वांचे मन भरून आले. व पुढच्या जिल्ह्यासाठी जगद्गुरूश्रींच्या सिद्ध पादुकांचे प्रस्थान करण्यात आले.



