*तळवडे ग्रामपंचायत व पितांबरी कंपनी आयोजित मधमाशी पालन प्रशिक्षणाला उत्तम प्रतिसाद*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तळवडे ग्रामपंचायत व पितांबरी कंपनी आयोजित मधमाशी पालन प्रशिक्षणाला उत्तम प्रतिसाद*
*तळवडे ग्रामपंचायत व पितांबरी कंपनी आयोजित मधमाशी पालन प्रशिक्षणाला उत्तम प्रतिसाद*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायत, पितांबरी कंपनी आणि सुगंधी व समृध्द कोकण विकास मंच आयोजित मधमाशी पालन प्रशिक्षणाला तळवडे येथे उत्तर प्रतिसाद लाभला. या प्रशिक्षणाचा लाभ एकूण 34 प्रशिक्षणार्थीनी घेतला. तळवडे ग्रामपंचायत आणि पितांबरी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांच्या पुढाकाराने तळवडे मधाचे गाव हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळामार्फत 54 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहेत. मधमाशी आभ्यासक प्रा. हेमंतकुमार डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे चार दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले. याचा लाभ एकूण 34 प्रशिक्षणार्थींनी घेतला. या प्रशिक्षणामध्ये मधमाशी संगोपन, मध गोळा करणे, वेगवेगळ्या झाडांचे परागीभवन कसे निर्माण करता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी पितांबरी कंपनीचे सुहास प्रभुदेसाई व दिलीप जाधव यांनी सर्वाचे आभार मानले व त्यांना शुभेच्छा दिल्या.



