*शहरातील वाढीव व अतिरिक्त घरपट्टीची सक्ती रद्द करा,उबाठा गटाची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शहरातील वाढीव व अतिरिक्त घरपट्टीची सक्ती रद्द करा,उबाठा गटाची मागणी*
*शहरातील वाढीव व अतिरिक्त घरपट्टीची सक्ती रद्द करा,उबाठा गटाची मागणी*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नगर परिषदेची वाढीव व ज्यादा आकाराची घरपट्टी व नळपट्टी वसुल करण्यात येत आहे तरी ती माफक व कमी दरात करण्यात यावी अशी मागणी नंदुरबार जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे. नंदुरबार शहरातील नागरिक वाढत्या महागाईने त्रस्त आहेत. शहरात रोजगाराची समस्या आहेत शहरात उद्योग धंदे नाहीत. तरी नागरिक कसेतरी आपली उपजीविका भागवत असताना नगर पालिकेने वाढीव घरपट्टी लादल्याने नागरिकांची पिळवनुक होत आहे. तरी मुळ घर पट्टी वसुल करण्यात यावी व व्याजाचा भार नागरिकांवर लादू नये. वाढीव घरपट्टी व्याजासह कमी करण्यात यावी तसेच शहरातील अनेक प्रभागात समस्या आहे. त्या तात्काळ सोडवण्यात याव्या अन्यथा शिवसेना (उध्व बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल व शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल. सदर मागणीचे निवेदन कार्यालयीन अधीक्षक जयसिंग गावित यांना देण्यात आले यावेळी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष पंडित माळी, संगीता खंडू माळी, खंडू माळी, शेखर जाधव, इम्तियाज कुरेशी, दिनेश भोपे, सागर पाटील, राज माळी, वैशाली माळी आदी उपस्थित होते.



