*सेजल अनंत गुरव हिची आग्रा येथे होणाऱ्या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सेजल अनंत गुरव हिची आग्रा येथे होणाऱ्या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड*
*सेजल अनंत गुरव हिची आग्रा येथे होणाऱ्या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड*
राजापूर(प्रतिनिधी):-आग्रा येथे होणाऱ्या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत 19 वर्षांखालील मुलींच्या गटात राजापूरमधील तळवडे गावची सुकन्या कुमारी सेजल अनंत गुरव हिची खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. याबद्दल कुमारी सेजल गुरव हीचे तळवडे गाव आणि तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच अंकित करंबळे व विराज वाफेलकर यांची देखील या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या तिन्ही खेळाडूंचे तालुक्यातून अभिनंदन करण्यात येत आहे. हे तिन्ही खेळाडू टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, राजापूरतर्फे स्पर्धेत सहभागी होणार असून, त्यांना जिल्हा सचिव डॉ. योगिता खाडे तसेच तालुका सचिव युवराज मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तळवडे सामाजिक कार्यकर्ते व तालुक्यातील जेष्ठ पत्रकार सुरेश गुडेकर यांनी कुमारी सेजल अनंत गुरव, अंकित करंबळे आणि विराज वाफेलकर यांचे अभिनंदन केले आहे.



