*लाखापुर माध्यमिक विद्यालयात शबरी सेवा समिती मार्फत सूर्यनमस्कार स्पर्धा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लाखापुर माध्यमिक विद्यालयात शबरी सेवा समिती मार्फत सूर्यनमस्कार स्पर्धा*
*लाखापुर माध्यमिक विद्यालयात शबरी सेवा समिती मार्फत सूर्यनमस्कार स्पर्धा*
तळोदा(प्रतिनिधी):-शबरी सेवा समिती यांच्या वतीने यंदा उत्साहात सूर्यनमस्कार स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. भारतीय संस्कृतीतील आरोग्यपरंपरा जपण्याचा आणि युवकांमध्ये शारीरिक‐मानसिक तंदुरुस्तीबाबत जागरूकता निर्माण करण्याचा समितीचा प्रमुख उद्देश असून शबरी सेवा समितीचे सचिव वृषाली करंदीकर यांच्या संकल्पनेतून सर्वत्र स्पर्धा आयोजित केला जात आहेत.
स्पर्धेत स्पर्धकांनी सलग सूर्यमालिका, योग्य श्वसनक्रिया, शरीरसंतुलन आणि लयबद्ध हालचालींचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. परीक्षकांनी स्पर्धकांची लय, गती, शारीरिक संतुलन, श्वसनशास्त्र आणि एकूण सादरीकरण या निकषांवर पाहणी केली. सूर्य नमस्काराचे आरोग्यासाठीचे फायदे, जसे की शरीरातील लवचिकता, स्नायूंची ताकद, श्वसन संस्थेची सुधारणा, मानसिक एकाग्रता आणि रोगप्रतिकार शक्ती वाढ यावर मार्गदर्शन केले. ग्रामीण भागात योगाभ्यासाला प्रोत्साहन देणे हे समितीचे ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले. एकूणच, शबरी सेवा समितीच्या सूर्यनमस्कार स्पर्धेमुळे आरोग्य, संस्कार आणि शिस्तीचा सुंदर संगम पहावयास मिळाला. स्थानिक नागरिकांनीही हा उपक्रम अत्यंत प्रशंसनीय ठरल्याचे सांगितल शबरी सेवा समिती स्पर्धा आरंभ तीन डिसेंबर पासून तर 12 डिसेंबर पर्यंत सूर्यनमस्कार स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण 18 शाळांचा समावेश असून शाळांचे नावे पुढीलप्रमाणे धनपूर सावरपाडा बंधारा खर्डी अलवान पाडळपूर वर पाडा राजणी लाखापूर न्यू बन छोटा धनपूर बन जुवानी अशा शाळांच्या समावेश होता माध्यमिक लाखापूर येथे स्पर्धेच्या समारोप करण्यात आला
लाखापुर माध्यमिक विद्यालयात शबरी सेवा समिती मार्फत सूर्य नमस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला. विजेते स्पर्धकांना शबरी सेवा समिती मार्फत उत्कृष्ट सूर्यनमस्कारासाठी पारितोषिक तसेच प्रमाणपत्र देण्यात येणार आले. शबरी सेवा समितीचे तालुका समन्वयक नकुल ठाकरे, उप समन्वयक अरविंद धानका, राकेश नाईक यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे नियोजन करण्यात आले असून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय विजयी घोषित करण्यात आले. इयत्ता पाचवी ते सातवीच्या लहान मुलींच्या गटातून प्रथम क्रमांकाचे मानकरी स्पर्धक इयत्ता सातवी प्रभावती शिवाजी डुमकुळ, द्वितीय क्रमांकाने विजयी मानकरी स्पर्धक इयत्ता पाचवी अंजली रोता पवार, तसेच तृतीय क्रमांकाचे विजयी मानकरी इयत्ता सातवी रितिका उघड्या शेवाळे, यांना विजयी घोषित करण्यात आले. तसेच मोठ्या गटात प्रथम क्रमांकाचे विजेते स्पर्धक मानकरी इयत्ता दहावी विद्या धनसिंग राहसे, द्वितीय क्रमांकाचे विजेते स्पर्धक मानकरी इयत्ता आठवी पायल अभेसिंग राहसे, तृतीय क्रमांक विजयी स्पर्धक मानकरी राजनंदनी छगन पाडवी,
तसेच मुलांच्या लहान गटात इयत्ता पाचवी ते सातवी प्रथम क्रमांकाचे विजयी स्पर्धक मानकरी इयत्ता पाचवी साजन सुखदेव नाईक, द्वितीय विजेते स्पर्धक मानकरी इयत्ता सहावी अश्विन यशवंत ठाकरे, तसेच तृतीय स्पर्धक विजेते मानकरी अश्विन सुरेश मोरे, आणि आठवी ते दहावी मुलांच्या मोठ्या गटात प्रथम क्रमांकाचे विजयी स्पर्धक मानकरी रोहन सुरेश ठाकरे, द्वितीय क्रमांकाचे विजयी स्पर्धक मानकरी विष्णू काशीराम नाईक, तसेच तृतीय क्रमांकाच्या विजयी स्पर्धक मानकरी अजय रवींद्र राहसे, सर्व स्पर्धकांना शबरी सेवा समितीमार्फत लिहिण्याचे पॅड कंपास स्केच पेन पाऊच वही पेन पारितोषिक देण्यात आले. शबरी सेवा समितीचे तालुका समन्वयक नकुल ठाकरे यांनी सूर्यनमस्काराचे फायदे सांगितले
तसेच उप समन्वयक अरविंद धानका यांनी विविध व्यायामाचे योगासने करून त्यानंतर राकेश ठाकरे यांनी पंचाची भूमिका निभावली यावेळी फिरोज अली सय्यद यांनी समादेशक म्हणून कामकाज पाहिले विजयी स्पर्धकांचे संस्थेचे सचिव ऋषिका गावित मुख्याध्यापक योगेश पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद राणे तर आभार मंगल पावरा यांनी मानले.



