*जिल्हा परिषद काथर्दे खुर्द शाळेत सामाजिक सद्भावना आरोग्य शिबिर संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हा परिषद काथर्दे खुर्द शाळेत सामाजिक सद्भावना आरोग्य शिबिर संपन्न*
*जिल्हा परिषद काथर्दे खुर्द शाळेत सामाजिक सद्भावना आरोग्य शिबिर संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहादा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आरोग्य संवर्धनासाठी जिल्हा परिषद मराठी शाळा काथर्दे खुर्द येथे आज सामाजिक सद्भावनेतून भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात प्राथमिक ते उच्च प्राथमिक अशा सर्व विद्यार्थ्यांची वैयक्तिक तपासणी करून त्यांना आवश्यक औषधे तसेच पोषणपूरक गोळ्या देण्यात आल्या. आरोग्य तपासणी व जनजागृतीचे उपक्रम या आरोग्य शिबिरात डॉ. तुषार सनंसे, डॉ. वसंत पाटील आणि सचिन वळवी यांनी विद्यार्थ्यांची सविस्तर तपासणी करून आरोग्याविषयक मार्गदर्शन केले.
तपासणीदरम्यान डॉ. सनंसे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता, संतुलित आहार, नियमित व्यायाम व आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व यावर सोप्या भाषेत मार्गदर्शन करून जागरूकता निर्माण केली. वाढत्या आजारपणाच्या पार्श्वभूमीवर मुलांनी स्वच्छ सवयी जोपासणे आणि पोषक आहार घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सनंसे यांची समाजसेवा आदर्शवत कार्य परिवर्धा, पाडळदा काथर्दा, वैजाली, शहादा परिसरात आरोग्यदूत म्हणून काम करणारे डॉ. तुषार सनंसे हे आर्थिक दृष्ट्या कमकुवत कुटुंबांतील रुग्णांना मोफत किंवा सवलतीत उपचार मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा ग्रामीण रुग्णांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांनी संकल्प केला आहे.“गोरगरीबांना आरोग्य सेवा देणे हीच खरी ईश्वरसेवा” या भावनेतून त्यांनी अनेकांना वेळोवेळी आवश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली असून त्यांच्या कार्याचा परिसरातील जनतेला मोठा आधार वाटतो.
स्थानिक नेतृत्व व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग आरोग्य शिबिराच्या आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. गौरी वळवी, उपसरपंच गणेश वळवी यांनी विशेष सहकार्य केले.
तसेच मुख्याध्यापक विजय सोनवणे, शिक्षक श्रीकांत वसईकर, तुकाराम अलट, शारदा कडवे, जंगी वळवी, अनिता पवार यांसह संपूर्ण शिक्षकवर्गाने मुलांच्या आरोग्य तपासणीचे नियोजन उत्तमरीत्या पार पाडले. आरोग्यदायी शालेय वातावरण निर्मितीची दिशा या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन तयार झाला असून भविष्यात शाळेत नियमित आरोग्य तपासणी, पोषण जागरूकता आणि स्वच्छता अभियान राबवण्याची शाळा व्यवस्थापनाची तयारी असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. सामाजिक सद्भावना, शालेय सहकार्य आणि आरोग्य सेवकांची निःस्वार्थ वृत्ती यांच्या संगमातून हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.



