*श्री समर्थ कृपा इन्स्टिट्यूट वेरळ येथे माधव विश्वनाथ अंकलगे सरांच्या करिअर मार्गदर्शन व्याख्यानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्री समर्थ कृपा इन्स्टिट्यूट वेरळ येथे माधव विश्वनाथ अंकलगे सरांच्या करिअर मार्गदर्शन व्याख्यानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*श्री समर्थ कृपा इन्स्टिट्यूट वेरळ येथे माधव विश्वनाथ अंकलगे सरांच्या करिअर मार्गदर्शन व्याख्यानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
खेड(प्रतिनिधी):-श्री संत रोहिदास सभागृह, महाड जि. रायगड याठिकाणी आयोजित श्री समर्थ कृपा इन्स्टिट्यूट, वेरळ, ता. खेड, जि. रत्नागिरी यांच्या वतीने विद्यार्थी, पालक यांच्यासाठी आयोजित करिअर मार्गदर्शन या कार्यक्रमात इयत्ता दहावी नंतर काय? या विषयांवर व्याख्याते माधव विश्वनाथ अंकलगे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीमध्ये अभ्यासाची तयारी कशी करावी, त्यासाठी आवश्यक नियोजन याबाबत मार्गदर्शन करतानाच विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्यात कोणत्याक्षेत्रात करिअर करावे त्यासाठी कोणती साईड घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच यावेळी ENTRANCE TEST मध्ये यशस्वी आणि स्कॉलरशिप मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला श्री समर्थ कृपा इंग्लिश मेडियम स्कुल वेरळचे अध्यक्ष सुयश पाष्टे, सचिव शेटवे, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.