*एकलव्यची वैष्णवी मानकर राष्ट्रीय स्तरावर पहिली*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एकलव्यची वैष्णवी मानकर राष्ट्रीय स्तरावर पहिली*
*एकलव्यची वैष्णवी मानकर राष्ट्रीय स्तरावर पहिली*
नंदूरबार(प्रतिनिधी):-भारत सरकारच्या क्रीडा व युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे आगरतळा, सिक्कीम येथे दिनांक 27 ते 30 नोव्हेंबर दरम्यान घेण्यात आलेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना सतरा वर्षाखालील वयोगटात एकलव्य विद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी संदीप मानकर हिने उत्कृष्ट कामगिरी करत देशात पहिला क्रमांक मिळवित गोल्ड मेडल मिळविले. वैष्णवीला बालपणापासूनच बुद्धिबळ या खेळाची आवड असून तिने कठोर परिश्रम व नियमित दीर्घ सराव याने हे यश प्राप्त केले आहे.
वैष्णवीच्या या उज्वल यशासाठी आज पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळातर्फे तिचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुहास नटावदकर यांनी वैष्णवीला गौरविले. याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की वैष्णवी सारख्या विद्यार्थिनी संस्थेचे नाव लौकिक उज्वल करतात आणि संस्थेच्या यशात भर घालतात. वैष्णवीच्या यशाचा संस्थेला अभिमान आहे व अन्य विद्यार्थ्यांनीही वैष्णवी चा आदर्श घेऊन विविध क्षेत्रात उज्वल कामगिरी करून संस्थेचा नावलौकिक वाढवावा असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चौधरी, धर्मेंद्र मराठे, वसंत वसईकर , मिलिंद वडनगरे, टिका पाडवी, कल्पेश तांबोळी तथा क्रीडा विभागाचे धोंडीराम शिनगर, वैष्णवी चे पालक संदीप मानकर उपस्थित होते. विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर यांनीही वैष्णवीला शुभेच्छा दिल्या. वैष्णवीला विद्यालयाच्या क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.



