*संतोष प्रतिष्ठान (रजि.) यांच्यातर्फे राजापूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपर्क कार्यालयास संगणक संच भेट*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*संतोष प्रतिष्ठान (रजि.) यांच्यातर्फे राजापूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपर्क कार्यालयास संगणक संच भेट*
*संतोष प्रतिष्ठान (रजि.) यांच्यातर्फे राजापूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपर्क कार्यालयास संगणक संच भेट*
राजापूर(प्रतिनिधी):-राजापूर तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे संपर्क कार्यालयाला संतोष प्रतिष्ठान (रजि.) या संस्थेच्या वतीने तालुका संपर्क प्रमुख अनिल भोवड यांच्या शिफारशीने माजी आमदार गणपत कदम यांच्या उपस्थितीत संगणक संच संपर्क कार्यालयाला भेट स्वरूपात सुपूर्द करण्यात आला त्या बद्दल राजापूर तालुका शिवसेनेच्या वतीने संतोष प्रतिष्ठान संस्थेचे जाहीर आभार व्यक्त करण्यात आले. संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. व सर्व पदाधिकारी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी प्रमुख उपस्थिति विधानसभा क्षेत्र संघटक रामचंद्र सरवणकर, विधानसभा संपर्क प्रमुख चंद्रप्रकाश नकाशे, तालुकाप्रमुख कमलाकर कदम,शहर संपर्क प्रमुख सत्यवान कदम, संतोष प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णा सावंत, सचिव सुनील शिवगण, उपाध्यक्ष कृष्णा बावकर, दत्ताराम साटम, प्रकाश चव्हाण, उपतालुकाप्रमुख अनाजी गोटम, अभिजित तेली, तालुका संघटिका प्राची शिर्के, विभाग प्रमुख संतोष हातणकर, नरेश शेलार, रुपेश नारकर, उपविभाग प्रमुख नामदेव नागरेकर, विजय बंडबे, बाळू हरयाण, शशी गोळवस्कर, विजय मांडवकर, गणेश गिरकर, सुभाष पावणाक, अमोल पाडेकर, विलास नाडणकर, मल्लू कोल्हे, एकनाथ चव्हाण, सुरेश हरयाण, शिवसहकारचे प्रभाकर कानडे, रवी पैकडे, उपतालुका संघटिका सौ. समीक्षा कुवेस्कर, विभागसंघटक वर्षा चव्हाण प.स.सदस्या सौ.नलिनी शेलार, उपविभाग संघटिका मानसी नांदगावकर, सुचिता सावंत, शिवसैनिक, युवा सेना पदाधिकारी, महिला आघाडी मोठया संख्येने उपस्थित होते.



