*पोक्सो गुन्हयातील आरोपीला तात्काळ ताब्यात घेत तालुका पोलीसांकडून 48 तासात दोषारोपपत्र न्यायालयात सादर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पोक्सो गुन्हयातील आरोपीला तात्काळ ताब्यात घेत तालुका पोलीसांकडून 48 तासात दोषारोपपत्र न्यायालयात सादर*
*पोक्सो गुन्हयातील आरोपीला तात्काळ ताब्यात घेत तालुका पोलीसांकडून 48 तासात दोषारोपपत्र न्यायालयात सादर*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुका पोलीस ठाणे हद्दीतील जुनमोहिदा येथील पिडीत अल्पवयीन बालीका हिचा आरोपी पावबा साहेबराव घोडसे, वय 21 वर्षे, मयुर कैलास पाटील, वय 22 वर्षे, दोन्ही राहणार जुनमोहिदे, ता. जि. नंदुरबार हे वेळोवेळी पाठलाग करीत असे, त्याचप्रमाणे सदर आरोपींनी सदर अल्पवयीन बालीकेचा काही दिवसांपूर्वी पाठलाग करत तिला अश्लील शब्दोच्चार व हावभाव केला म्हणून नमुद आरोपीवर नंदुरबार तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 401/ 2025 भा.न्या. संहिता 78(2), 79 सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधि. कलम 12 प्रमाणे 17 नोव्हेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी दिनेश भदाणे यांनी लागलीच तपास सुरु करत नमुद आरोपींना तात्काळ अटक केली. नमुद गुन्हयात अल्पवयीन बालिकेला जलद न्याय मिळावा व आरोपीस त्वरीत शिक्षा व्हावी यासाठी गुन्हयाचे तपास अधिकारी पोउपनि सुनिल भामरे यांनी 48 तासांच्या आत तपास पुर्ण करुन गुन्हयाचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी दिनेश भदाने, पोउपनि सुनिल भामरे, असई/मोतीराम बागुल, पोहेको राजेंद्र धनगर, एकनाथ ठाकरे यांनी केली आहे.



