*गहाळ झालेले 215 मोबाईल हस्तगत करण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलास यश, 32 लाख 97 हजार 896 रुपये किमतीचे एकूण 215 मोबाईल हस्तगत, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याहस्ते मोबाईल मूळ मालकांना परत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गहाळ झालेले 215 मोबाईल हस्तगत करण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलास यश, 32 लाख 97 हजार 896 रुपये किमतीचे एकूण 215 मोबाईल हस्तगत, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याहस्ते मोबाईल मूळ मालकांना परत*
*गहाळ झालेले 215 मोबाईल हस्तगत करण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलास यश, 32 लाख 97 हजार 896 रुपये किमतीचे एकूण 215 मोबाईल हस्तगत, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याहस्ते मोबाईल मूळ मालकांना परत*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील मागील काही महिन्यांमध्ये गहाळ झालेले नागरिकांचे विविध कंपन्यांचे मोबाईल फोन शोधण्यात नंदुरबार पोलीसांना यश मिळाले असुन, त्यामध्ये तब्बल 32 लाख 7 हजार 896 रुपये किमतीचे एकुण 215 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. पोलीसांनी सी.ई. आय. आर, पोर्टलचे मदतीने मोबाईल ट्रॅकिंगसाठी IMEI क्रमांकाचा वापर करुन विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली. यात गहाळ झालेले मोबाईल जिल्हयातून तसेच जिल्हयाबाहेरुन देखील हस्तगत करण्यात आले असुन त्यामध्ये सायबर सेल, स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस ठाणे यांनी संयुक्तरित्या कामगिरी करत मोबाईल्स हस्तगत केले आहेत. आज रोजी संवाद हॉल, पोलीस अधीक्षक कार्यालय येथे उपस्थित गहाळ झालेल्या मोबाईलचे मूळ मालकांना त्यांचे मोबाईल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्याहस्ते परत करण्यात आले असुन, उपस्थितांनी पोलीसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करुन आभार मानले आहे. "यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी नागरिकांना आवाहन केले की, मोबाईल हरवल्यास तात्काळ सी.ई. आय. आर. पोर्टलवर ऑनलाईन तक्रार दाखल करावी तसेच आपल्या मोबाईलचा IMEI क्रमांक जपून ठेवणे गरजेचे आहे, जेणेकरुन मोबाईलचा लवकर शोध घेण्यात मदत होईल." सदर कार्यक्रमावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच इतर अधिकारी व अंमलदार असे उपस्थित होते.