*नंदुरबारमध्ये SAANS कॅम्पेन 2025 चे लोकार्पण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबारमध्ये SAANS कॅम्पेन 2025 चे लोकार्पण*
*नंदुरबारमध्ये SAANS कॅम्पेन 2025 चे लोकार्पण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या आरोग्य विभागामार्फत, प्लॅन इंडिया यांच्या सेल्फ-केअर फॉर न्यू मॉम्स अँड किड्स अंडर 5 प्रकल्प, रेकिटच्या यांच्या सहयोगाने SAANS (Social Awareness and Action to Neutralise Pneumonia) कॅम्पेन 2025 चे औपचारिक लोकार्पण करण्यात आले. हा उपक्रम डॉ. मिताली सेठी (IAS), जिल्हाधिकारी नंदुरबार आणि नमन गोयल (IAS), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याहस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाला डॉ. रविंद्र भ. सोनवणे जिल्हा आरोग्य अधिकारी नंदुरबार, आणि हरिभाऊ हाके उप मुख्य कार्यकारी अधिकारी ICDS यांचीही मान्यवर उपस्थिती होती.
हा कॅम्पेन 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत राबविण्यात येणार असून, पाच वर्षाखालील मुलांमध्ये न्यूमोनियाची, लवकर ओळख व वेळेवर उपचार याबाबत जनजागृती वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. समुदायामध्ये योग्य माहिती, काळजी घेण्याची सवय आणि तात्काळ वैद्यकीय मदत याबाबत जागरूकता निर्माण करणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.



