*स्वातंत्र्य सैनिक शाहीर हरिभाऊ पाटील स्मृतिदिनी गरजूंचे आरोग्य निदान, पंचक्रोशीतून प्राचार्य बी.एस. पाटील, संयोजकांप्रती कृतज्ञता प्रदान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*स्वातंत्र्य सैनिक शाहीर हरिभाऊ पाटील स्मृतिदिनी गरजूंचे आरोग्य निदान, पंचक्रोशीतून प्राचार्य बी.एस. पाटील, संयोजकांप्रती कृतज्ञता प्रदान*
*स्वातंत्र्य सैनिक शाहीर हरिभाऊ पाटील स्मृतिदिनी गरजूंचे आरोग्य निदान, पंचक्रोशीतून प्राचार्य बी.एस. पाटील, संयोजकांप्रती कृतज्ञता प्रदान*
साक्री(प्रतिनिधी):-प्राचार्य दादासाहेब बी.एस. पाटील हे रुग्ण म्हणून माझ्याकडे आले आणि क्षणात माझे मित्र झाले. मी त्यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी जे एैकले त्यापेक्षाही त्यांचे कार्यकर्तृत्व व्यक्तीमत्त्व मोठे असून वयाच्या 80 व्या वर्षाच्या उंबरठ्यावर असूनही विविध क्षेत्रात त्यांची समाजोपयोगी कामाची उत्तुंग झेप पाहून वाटते बी.एस. पाटील ही भावी पिढीसाठी प्रेरणादायी प्रेरक शक्ती आहे’’ असे कौतुकोद्गार खान्देशातील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. वाय.जे. महाले यांनी रविवारी साक्री तालुक्यातील छडवेल-कोर्डे या गावी नूतन माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य सैनिक शाहीर हरिभाऊ पाटील यांच्या स्मृति दिनानिमित्त शाहिर हरिभाऊ पाटील बहुउद्देशिय सेवाभावी संस्था नंदूरबार, एस.एम. बी.टी. हॉस्पिटल घोटी, कांतीलक्ष्मी शाह नेत्र रुग्णालय नंदूरबार यांच्या वतीने गोरगरीब गरजुंसाठी आयोजित मोफत रोगनिदान व उपचार शिबिरात उद्घाटक म्हणून बोलतांना काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पराग बेडसे होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तमराव बोरसे, एल.बी. मोरे, उज्ज्वला बेडसे, अनिल सोनवणे, प्राचार्य पी.झेड. कुवर, प्रा. एल.जी. सोनवणे, डॉ. दिपक अंधारे, डॉ. सी.डी. महाजन, भैय्या सोनवणे, अण्णा बोरसे, प्राचार्य संजय बच्छाव, पाडवी यांच्या सोबतच उपचारासाठी घोटी येथील डॉक्टर चमू डॉ. आशुतोष मणेश्वर, डॉ. तेजस मिसर, डॉ. जान्हवी अहिरराव, डॉ. आश्रीत सह, डॉ. शुभम चौधरी, डॉ. शाम सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्राचार्य बी.एस. पाटील यांनी प्रास्ताविकातून शाहीर हरिभाऊ पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. ते छडवेल कोर्डे येथील सुपूत्र असल्याने या गावी त्यांची स्मृती जागृत रहावी म्हणून श्रमिक शोषित कष्टकऱ्यांसाठी त्यांनी झीज सोसली. चिमणी पडून जळालेल्या आईचा उपचाराअभावी मृत्यु झाला होता. म्हणून भाऊंनी गावासाठी रुग्णवाहिका भेट दिली होती. म्हणून या पंचक्रोशीतील गोरगरीबांना मोफत उपचार व्हावेत यासाठी रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन प्रसंगी प्रथम रुग्ण लक्ष्मण रामा अहिरे यांच्यावर उपचार करून पंचक्रोशितून आमखेल, बासर, वाल्हेव, पांगण, कायटेक, पताळे, शिंदबन, वसंत नगर, इसर्डे, पेटले, खोरी टिटाणे, ब्राह्मणवेल, छडवेल कोर्डे येथून सुमारे अकराशे गोरगरीब कष्टकरी, श्रमिक जनतेने तपासणी व उपचार ‘दवा’ घेत आयोजक बी.एस. पाटील, कांतीलक्ष्मी शाह नेत्र रुग्णालय नंदूरबार एस.एम.बी.टी. हॉस्पिटील घोटी यांना ‘दुवा’ देत त्यांच्यासह उपस्थित प्रमुख पाहुणे डॉक्टरांनीही रुग्ण तपासणीसाठी सक्रिय सहभाग नोंदवला हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होय. मोफत रोगनिदान व उपचार झाल्याने लाभार्थींच्या समाधानी चेहऱ्यावरून दिसत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पराग बेडसे यांनी आपल्या भाषणातून आयोजकांना धन्यवाद देत रोग निदान शिबिरातून संवेदनशिलता व बांधिलकी जपल्याचे नमूद केले. प्रारंभी कर्मवीर बेडसे व शाहीर हरीभाऊ पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करून जय जय महाराष्ट्र! या राज्य गिताने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. संपूर्ण कार्यक्रमास ग्रामस्थांसह नूतन माध्यमिक विद्यालय छडवेल कोर्डे या शाळेचे शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, विद्याथिनींचे शालेय मंत्रीमंडळाचे विशेष सहकार्य लाभले. स्वातंत्र्य सैनिक शाहीर हरिभाऊ बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. दिपक अंधारे यांनी प्रमुख मान्यवर, सहभागी रुग्ण, उपचार करणारे डॉक्टर्स व शिबिराच्या यशस्वीतेसाठी राबणाऱ्या हातांच्या प्रती आभारातून ऋण व्यक्त केले.



