*कॉपर केबल चोरी करुन विक्री करणारे व चोरीचा माल विकत घेणारे इसम स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात, सुझलॉन टॉवरमधील कॉपर वायर चोरीचे 2 वेगवेगळे गुन्हे उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश, दोन्ह
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कॉपर केबल चोरी करुन विक्री करणारे व चोरीचा माल विकत घेणारे इसम स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात, सुझलॉन टॉवरमधील कॉपर वायर चोरीचे 2 वेगवेगळे गुन्हे उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश, दोन्ह
*कॉपर केबल चोरी करुन विक्री करणारे व चोरीचा माल विकत घेणारे इसम स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात, सुझलॉन टॉवरमधील कॉपर वायर चोरीचे 2 वेगवेगळे गुन्हे उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश, दोन्ही गुन्हयातील मिळून एकूण 5 लक्ष 22 हजार 200 रु. किमतीचा मुद्देमाल हस्तगत*
नंदूरबार(प्रतिनिधी):-3 जून 2025 ते 20 जून 2025 रोजीच्या दरम्यान शनिमांडळ, बलवंड, वटबारे, आक्राळे शेत शिवारातील सुझलॉन टॉवरमधील कॉपर केबल कोणीतरी अज्ञात चोरटयाने धारदार हत्याराने कापुन चोरुन नेले म्हणून नंदुरबार तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 315 /2025 भा.न्या. संहिता कलम 303 (2), 324(4) प्रमाणे 9 ऑक्टोबर 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरू असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हट्टी गावातील सराईत आरोपी नामे सुकलाल कुन्हाडे व त्याच्या इतर साथीदारांनी मिळून केला आहे, अशी खात्रिशीर माहितीवरुन स्था. गु.शा. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकास खात्री करुन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. मिळालेल्या गोपनिय बातमीचे अनुषंगाने स्था. गु.शा. पथकाने नमुद आरोपीचा शोध घेतला असता तो मिळुन आला, त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव सुकलाल बाबुलाल कुन्हाडे, वय 30 वर्षे, रा.हट्टी, ता. साक्री जि. धुळे असे सांगितले. त्यास नमुद गुन्हयाबाबत विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदारांसह केला असल्याची कबुली दिली. त्याअनुषंगाने स्था. गु.शा. पथकाने त्याने सांगितलेल्या साथीदारांचा शोध घेतला असता त्याचे साथीदारांना देखील ताब्यात घेण्यात पथकास यश मिळाले. त्यामध्ये त्याचे साथीदारांची नावे प्रविण दशरथ ठाकरे, वय 19 वर्षे, शरद नाना पदमोर, वय 26 वर्षे. देवा शामराव सोनवणे, वय 27 वर्षे, राजेंद्र मोतीलाल पदमोर, वय- 26 वर्षे, सर्व रा.हट्टी ता. साक्री जि. धुळे असे असून त्यांनी मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वी विविध सुझलॉन टॉवरमध्ये वापरण्यात येणारी तांब्याची तार शनिमांडळ, बलवंड, वटबारे, आक्राळे शेत शिवारातुन चोरी केले असल्याचे सांगितले. त्यांनी सदरचा मुद्देमाल हा दोंडाईचा येथील भंगार व्यापारी शन्नु ऊर्फ मुस्ताक शाह फकीर, रा. गाँसिया नगर, दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे यास विक्री केला असुन बाकी मुद्देमाल हा आरोपी सुकलाल कुन्हाडे व प्रविण ठाकरे अशांनी हट्टी गावाच्या शेत शिवारात लपवून ठेवला असल्याचे सांगितले. त्याअन्वये स्था.गु.शा. पथकाने भंगार विक्रेत्यास ताब्यात घेतले. स्था.गु.शा. पथकास सदर गुन्हयातील एकुण 1 लक्ष 56 हजार 100 रुपये किमतीची 223 कि.ग्रॅ. वजनाची कॉपर वायर हस्तगत करण्यात यश मिळाले आहे.
त्याचप्रमाणे 8 ऑगस्ट 2025 ते 1 नोव्हेंबर 2025 दरम्यान भोणे, वावद, चाकळे, आक्राळे, ठाणेपाडा शेतशिवारातील सुझलॉन टॉवरमधील कॉपर केबल कोणीतरी अज्ञात चोरटयाने धारदार शस्त्राने कापुन चोरुन नेले म्हणून नंदूरबार तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 383/2025 भा.न्या. संहिता कलम 303(2) प्रमाणे 4 नोव्हेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरू असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनिय माहिती मिळाली की, चौपाळे गावातील संशयित इसम सुनिल वळवी व विजय वळवी यांनी त्यांचे इतर साथीदारांच्या मदतीने सदरचा गुन्हा केला असुन त्यांनी गुन्हयातील मुद्देमाल विक्री करण्याचे उद्देशाने चौपाळे ते नंदुरबार रस्त्यालगत एका झुडूपामध्ये लपवून ठेवला आहे, अशी खात्रिशीर माहितीवरुन स्था. गु.शा. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकास खात्री करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. मिळालेल्या गोपनिय बातमीचे अनुषंगाने स्था.गु. शा. पथकाने नंदुरबार शहरातून जाणता राजा चौक ते चौपाळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने जावून शोध घेतला असता त्यांना रस्त्यालगत एक निळ्या रंगाची तिनचाकी रिक्षा जवळ दोन ते तिन इसम हे संशयास्पद हालचाल करतांना दिसले. सदर इसमांवर पथकास संशय आल्याने त्यांचेकडे जावुन चौकशी करता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यांना त्याचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे विजय संजय वळवी, वय 23 वर्षे, रा.चौपाळे, ता.जि. नंदुरबार, निहाल शरिफ काकर, वय 25 वर्षे, रा. सुतार मोहल्ला, नंदुरबार, सिकंदर सुलतान काकर, वय 33 वर्षे, रा.दादरी फलीया, उनई नाका, व्यारा, जि. तापी, गुजरात असे सांगितले. त्यांचे ताब्यातील रिक्षाची पाहणी करता त्यामध्ये मागील बाजुस केबल व वजन काटा मिळून आले. सदर इसमांना विश्वासात घेऊन विचारपुस करता, सदरची केबल ही विजय वळवी याने चौपाळे गावातील त्याचे इतर साथीदारांसह मागील काही दिवसात विविध शेत शिवारातील सुझलॉन टॉवरमध्ये वापरण्यात येणारी कॉपर केबल चोरी करुन ती निहाल काकर व सिकंदर काकर यांना विक्री करण्याचे उद्देशाने येथे आले असल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे आरोपी विजय वळवी याने त्यांचे इतर साथीदारांची माहिती दिली त्याअन्वये स्था.गु. शा. पथकाने चौपाळे गावात जाऊन शोध घेतला असता ते मिळुन आले. त्यांची नावे अनुक्रमे 4. कमलेश विलास वळवी, वय- 28 वर्षे, आकाश अशोक गवळे, वय 28 वर्षे, प्रशांत माणिक पवार, वय 22 वर्षे, अर्जुन महारु पवार, वय- 19 वर्षे, योगेश रुपचंद पिंपळे, वय 25 वर्षे, दिनेश अंकुश वळवी, वय- 28 वर्षे, सुनिल संजय वळवी, वय-27 वर्षे, रविंद्र चंदु शिंदे, वय 21 वर्षे, अजय चंदर शिंदे, वय 19 वर्षे, सर्व राहणार चौपाळे, ता.जि. नंदुरबार असे असुन त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याचे स्वाधीन करण्यात आले आहे. सदर कारवाईत एकुण 3 लक्ष 66 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये 303 कि.ग्रॅ. वजनाची कॉपर वायर, वजन काटा, वाहन व रोख रक्कम असे हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, पोउपनि विकास गुंजाळ, पोह/मुकेश तावडे, दिनेश चित्ते, सुनिल येलवे, मोहन ढमढेरे, विशाल नागरे, ज्ञानेश्वर पाटील, अजित गावीत, पोकों/अभय राजपूत, राजेंद्र काटके यांनी केली आहे.



