*ज्येष्ठ नागरिकांतर्फे पूरग्रस्त निधी जमा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ज्येष्ठ नागरिकांतर्फे पूरग्रस्त निधी जमा*
*ज्येष्ठ नागरिकांतर्फे पूरग्रस्त निधी जमा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहादा तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक विविध मंडळातर्फे पूरग्रस्त निधी गोळा करण्यात आला. तो निधी सहाय्यक जिल्हाधिकारी व नायब तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाकडे सुपूर्त करण्यात आला. मे 2025 ते ऑक्टों 2025 यादरम्यान अपेक्षेपेक्षा जास्त अतिवृष्टी झाली. त्यात अनेक शेतकऱ्यांची पिके उध्वस्त झाली, तर अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले. त्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन राज्य शासनामार्फत विविध संघटना व संस्थांना करण्यात आले होते. त्यानुसार शहादा येथील लोकमान्य जेष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष रामजी पाटील यांनी सचिव गजानन विसपुते, रघुनाथ बेलदार, जे. डी. पाटील व इतर जेष्ठ नागरिकांच्या सहकार्याने विविध ज्येष्ठ नागरिक मंडळाकडून पूरग्रस्त निधी 25112 रुपये जमा केले. तो निधी सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णकांत कनवारीया यांना नायब तहसीलदार बी.डी वाडीले, लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व फेस्काॅम धुळे विभागीय संचालक रामजी पाटील, ज्येष्ठ नागरिक संपत कोठारी, रघुनाथ बेलदार व सेवानिवृत्त ग्राम विकास अधिकारी दिगंबर बेलदार यांनी सुपूर्त केला, नंतर तो पूरग्रस्त निधीत जमा करण्यात आला. लोकमान्य ज्येष्ठ नागरिक मंडळ शहादा, नरहरी जेष्ठ नागरिक मंडळ शहादा, सरदार पटेल ज्येष्ठ नागरिक संघ शहादा, सिद्धेश्वर जेष्ठ नागरिक मंडळ मलोणी, आई बाबा ज्येष्ठ नागरिक संघ विद्याविहार, जीवन ज्ञान साधना फाउंडेशन शहादा, मोहन पाटील, शरद पटेल, श्री दत्त जेष्ठ नागरिक मंडळ पुसनद, ज्येष्ठ नागरिक संघ नवापूर, जय करजी माता ज्येष्ठ नागरिक मंडळ करजई, श्री पंचकृष्ण ज्येष्ठ नागरिक संघ कुढावद, श्री गुरुदेव दत्त ज्येष्ठ नागरिक संघ डामरखेडा, कृष्णकांत दलाल, जेष्ठ नागरिक संघ खांडबारा, ज्येष्ठ नागरिक संघ तळोदा, शहादा तालुका जेष्ठ नागरिक संघ शहादा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ शहादा, नूरभाई नुराणी, साईबाबा जेष्ठ नागरिक मंडळ म्हसावद, सरदार पटेल ज्येष्ठ नागरिक संघ लांबोळा, मुरली मनोहर ज्येष्ठ नागरिक संघ पाडळदा, ज्येष्ठ नागरिक संघ मंदाणा, डी .ए. मोरे व लोणखेडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गुलाबराव पवार यांनी निधी दिला.



