*जिल्हा पोलीस दलातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 7 लाख 24 हजार 712 रुपयांचा मदत निधी सुपूर्त, राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी नागरिकांना मदत म्हणून जिल्हा पोलीसांचा मदतीचा
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हा पोलीस दलातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 7 लाख 24 हजार 712 रुपयांचा मदत निधी सुपूर्त, राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी नागरिकांना मदत म्हणून जिल्हा पोलीसांचा मदतीचा
*जिल्हा पोलीस दलातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 7 लाख 24 हजार 712 रुपयांचा मदत निधी सुपूर्त, राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी नागरिकांना मदत म्हणून जिल्हा पोलीसांचा मदतीचा हात*
नंदूरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या संकटाच्या काळात मदतीचा हात म्हणून नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एकुण 7 लक्ष 24 हजार 712 रुपये इतकी रक्कम मदत निधी म्हणून जमा करण्यात आली आहे, या मदत निधीचा उद्देश अतिवृष्टीग्रस्त बांधवांना शासनामार्फत मदत मिळवून देण्यासाठी असून, जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांनी स्वेच्छेने ही रक्कम योगदान स्वरुपात दिली आहे. "नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी पोलीस दलाच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत सर्व अधिकारी व अंमलदारांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. समाजहितासाठी
पोलीस दल नेहमीच तत्पर राहील, असा विश्वासही पोलीस अधीक्षकांनी यावेळी व्यक्त केला आहे."



