*सराफ व्यापाऱ्याचे अपहरण करुन बंदूकीचा धाक दाखवत जबरीने लुटमार करणारे पोलीसांच्या ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा व शहादा पोलीसांची संयुक्त कारवाई, 5 आरोपींकडून 4500 ग्रॅम चांदी व 52400 रुपये रोख र
											- देश-विदेश
 - व्यवसाय
 - मनोरंजन
 - राजनीति
 - विशेष बातमी
 - थोडक्यात बातमी
 - स्लाइडर
 - खेळ
 - आध्यात्मिकता
 - आरोग्य
 - ठळक बातम्या
 
*सराफ व्यापाऱ्याचे अपहरण करुन बंदूकीचा धाक दाखवत जबरीने लुटमार करणारे पोलीसांच्या ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा व शहादा पोलीसांची संयुक्त कारवाई, 5 आरोपींकडून 4500 ग्रॅम चांदी व 52400 रुपये रोख र
*सराफ व्यापाऱ्याचे अपहरण करुन बंदूकीचा धाक दाखवत जबरीने लुटमार करणारे पोलीसांच्या ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा व शहादा पोलीसांची संयुक्त कारवाई, 5 आरोपींकडून 4500 ग्रॅम चांदी व 52400 रुपये रोख रक्कम हस्तगत*
नंदूरबार(प्रतिनिधी):-27 ऑक्टोबर 2025 रोजी सराफ व्यवसायिक फिर्यादी  रितेश पारेख, रा. सोनारगल्ली, मेनरोड, शहादा ता. शहादा जि. नंदुरबार हे बुडीगव्हाण मार्गे म्हसावद येथे त्यांचे चारचाकी वाहनातून जात असतांना बुडीगव्हाण ते म्हसावद गावाच्या दरम्यान एक स्विफ्ट डिझायर वाहनातील पाच अनोळखी व्यक्तींनी त्यांचे वाहन फिर्यादी यांच्या वाहनासमोर आडवे करुन फिर्यादी यांना बंदूक व चाकुचा धाक दाखविला. त्यानंतर फिर्यादी यांचे अपहरण करुन त्यांना दुखापत केली होती व त्यांच्या ताब्यातील सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेले म्हणून शहादा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 581/2025 भा.न्या. संहिता कलम 310(2), 310(4) वगैरे प्रमाणे अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखा व शहादा पोलीस ठाणेकडून तपास सुरु असतांना उपलब्ध पुराव्यांचे आधारे व गोपनिय माहितीनुसार सदरचा गुन्हा हा धुळे येथील सराईत गुन्हेगार टोळीने येथील स्थानिकांच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झाले. त्याअन्वये गुन्हयातील साथीदारांबाबत गोपनिय माहिती घेता त्यामध्ये भरत गोविंद वडार, वय 49 वर्षे, रा. औरंगपूर ता. शहादा जि. नंदुरबार, रोहित ऊर्फ गोल्या संजय मराठे, वय- 26 वर्षे, रा. कानडी, ता. शहादा जि. नंदुरबार, अक्षय पांडूरंग सोनार, वय- 31 वर्षे, रा.रामेश्वर मंदीरजवळ, सोनारगल्ली, शहादा जि. नंदुरबार, पुर्वेश रमेश सोनवणे, वय 31 वर्षे, रा. जुनी पोस्ट गल्ली, शहादा जि. नंदुरबार, निलेश नाना पवार, वय 33 वर्षे, रा. सिध्देश्वर हॉस्पीटल, गरुड कॉलनी, देवपूर धुळे ता.जि.धुळे यांनी केला असल्याचे निष्पन्न होऊन त्यांना सदर गुन्हयाबाबत सखोल विचारपूस करता त्यांनी गुन्हयाची कबूली दिली असुन गुन्हयातील एकुण मुद्देमालापैकी 4500 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व 52,400 रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले, सपोनि प्रविण सोनवणे, पोउपनि मुकेश पवार, पोउपनि विकास गुंजाळ, पोउपनि भुनेश मराठे पोहेकों पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, सचिन वसावे, महेंद्र नगराळे, दादाभाई वाघ, योगेश थोरात, देविदास विसपुते पोना/विकास कापुरे, दिपक चौधरी पोकॉ शोएब शेख, भगवान सावळे अशांनी केली आहे.



