*औषध सुरक्षा सप्ताह 2025-शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत जनजागृती उपक्रम*
											- देश-विदेश
 - व्यवसाय
 - मनोरंजन
 - राजनीति
 - विशेष बातमी
 - थोडक्यात बातमी
 - स्लाइडर
 - खेळ
 - आध्यात्मिकता
 - आरोग्य
 - ठळक बातम्या
 
*औषध सुरक्षा सप्ताह 2025-शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत जनजागृती उपक्रम*
*औषध सुरक्षा सप्ताह 2025-शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत जनजागृती उपक्रम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद-औषध माहिती केंद्र (DIC) यांच्या मार्गदर्शनाखाली “औषध सुरक्षा सप्ताह 2025” (MedSafety Week 2025) हा जनजागृती कार्यक्रम 3 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 2025 या कालावधीत शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड, नंदुरबार येथे उत्साहात आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे समाजात औषधांचा सुरक्षित व जबाबदार वापर याबाबत जनजागृती निर्माण करणे. औषध साक्षरतेत वाढ करून नागरिकांना योग्य माहिती देणे, नोंदणीकृत फार्मासिस्टकडूनच औषधे खरेदी करण्याचे महत्त्व समजावणे आणि फार्मासिस्टचे स्थान समाजात अधिक दृढ करणे, हे या मोहिमेचे प्रमुख ध्येय आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष योगिता गणेश पाटील, सचिव गणेश गोविंद पाटील, तसेच प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
सुत्रसंचालन कल्याणी चौधरी यांनी केले असून, कार्यक्रम समन्वयक म्हणून ताश्विता मगरे यांनी कार्यभार सांभाळला आहे.
या आठवड्यात विविध औषध सुरक्षा जनजागृती उपक्रम, शैक्षणिक सत्रे व संवाद कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना “सुरक्षित औषध वापर म्हणजेच सक्षम आरोग्य व्यवस्थेचा पाया” हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
जनतेला आवाहन करण्यात आले की, औषधांचा वापर जबाबदारीने करावा आणि दुष्परिणामांची माहिती शासनाकडे नोंदवावी. “सुरक्षित औषध वापर व त्याचे दुष्परिणाम शासनाकडे नोंदवूया!” हा संदेश प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचा संकल्प या औषध सुरक्षा सप्ताहात घेण्यात आला.



