*रोझवा पुनर्वसन,नाल्याच्या पाण्यात बुडून दोन सख्या बहिणींचा मृत्यू*
											- देश-विदेश
 - व्यवसाय
 - मनोरंजन
 - राजनीति
 - विशेष बातमी
 - थोडक्यात बातमी
 - स्लाइडर
 - खेळ
 - आध्यात्मिकता
 - आरोग्य
 - ठळक बातम्या
 
*रोझवा पुनर्वसन,नाल्याच्या पाण्यात बुडून दोन सख्या बहिणींचा मृत्यू*
*रोझवा पुनर्वसन,नाल्याच्या पाण्यात बुडून दोन सख्या बहिणींचा मृत्यू*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथे नाल्यातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. ललिता रूपसिंग पावरा व कोबी रूपसिंग पावरा या दोन्ही बहिणी आपल्या आई तारकीबाई यांच्यासह सकाळी शेतात उडीद काढण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी जेवणापूर्वी त्या शेताजवळील स्मशानभूमी परिसरातील नाल्यात हातपाय धुण्यासाठी गेल्या. बराच वेळ झाल्यानंतर त्या परतल्या नाहीत म्हणून आई तारकीबाई शोध घेण्यासाठी गेल्या असता, त्यांना नाल्याजवळ कपडे व ओढणी दिसली. संशय आल्याने गावकऱ्यांना माहिती देण्यात आली. भाईदास पावरा, खेमजी वसावे, मोगा पावरा यांसह गावकऱ्यांनी पाण्यात शोध घेतला असता दोन्ही बहिणी मृत अवस्थेत आढळून आल्या. त्वरित तळोदा उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक अकिल पठाण यांनी पंचनामा केला असून मृतकांचे भाऊ सुरेश रूपसिंग पावरा यांच्या फिर्यादीवरून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रोझवा लघु सिंचन प्रकल्पाच्या नाल्यात जेसीबीद्वारे वाळू काढल्याने खोल खड्डे निर्माण झाले होते. त्याच ठिकाणी साठलेल्या पाण्यात बुडून दोन्ही बहिणींचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.



