*राष्ट्रभक्ती, शिस्त आणि नवभारताची पेरणी,जि.प हरणमाळ शाळेचा प्रेरणादायी उपक्रम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राष्ट्रभक्ती, शिस्त आणि नवभारताची पेरणी,जि.प हरणमाळ शाळेचा प्रेरणादायी उपक्रम*
*राष्ट्रभक्ती,शिस्त आणि नवभारताची पेरणी,जि.प हरणमाळ शाळेचा प्रेरणादायी उपक्रम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती व वंदे मातरम् 150 वर्षपूर्तीचा ऐतिहासिक संगम भारतातील राष्ट्रनिर्मितीचा पाया रचताना सरदार वल्लभभाई पटेल यांनी दाखविलेली दूरदृष्टी, दृढनिश्चय आणि संघटनशक्ती आजही देशाला प्रेरणा देते. त्यांची जयंती म्हणजे केवळ स्मरणदिन नाही, तर कर्तव्य, शिस्त व राष्ट्रनिष्ठा या मूल्यांचे पुनर्स्थापन करण्याचा दिवस. याच भावनेने नवापूर तालुक्यातील हरणमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 31 ऑक्टोबर 2025 रोजी उल्लेखनीय उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले.
राष्ट्रगीतापासून राष्ट्रसंरक्षणापर्यंत सर्वांगीण मूल्यशिक्षण
वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताची 150 वर्षपूर्ती, राष्ट्रीय एकात्मतेचा दिवस, स्वच्छता संकल्प व युवक सक्षमीकरण अशा चार प्रमुख मूल्याधिष्ठित ध्येयरेषा या कार्यक्रमातून स्पष्टपणे दिसून येतात. शाळेत विद्यार्थ्यांनी संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गीताचे सामूहिक गायन केले. आजच्या पिढीला गीताचा अर्थ, इतिहास आणि राष्ट्रीय अस्मिता समजणे तितकेच आवश्यक आहे जितके स्वर- अस्वर शिकणे. शाळेच्या दर्शनी भागात मांडलेल्या प्रदर्शनीने विद्यार्थ्यांच्या मनात भारतबोधाचे बीज घट्ट रोवले. राष्ट्रीय सुरक्षेची जाण “वीर युवा” कार्यक्रम जागतिक बदलत्या राजकीय समीकरणात भारताची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत असताना, युवकांमध्ये सुरक्षा -जागरूकता निर्माण करणे काळाची गरज आहे.
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार आयोजित “चाणक्य संरक्षण संवाद वीर युवा” या डिजिटल कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विद्यार्थ्यांनी पाहिले. लहान वयात राष्ट्रीय सुरक्षेविषयी मोलाची माहिती मिळणे म्हणजे सजग नागरिकत्वाकडे टाकलेले पहिले पाऊल आणि हीच शाळेची खरी ताकद आहे. शिस्त आणि सहभाग नेतृत्वगुणांची जडणघडण श्रावणी केंद्राचे केंद्रप्रमुख निंबा पाकळे यांनी भेट देत शाळेतील शैक्षणिक कार्य, शिक्षकांची बांधिलकी आणि विद्यार्थ्यांचा सहभाग यांचे कौतुक केले.
त्यांच्या मार्गदर्शनाने शिक्षकवृंदातील कार्यतत्परता अधिक बळकट झाली.
शाळा ही केवळ इमारत नसून मूल्य, संस्कार व जबाबदारीची कार्यशाळा असते, याची प्रभावी प्रतिकृती येथे दिसली. स्वच्छतेची संस्कृती समाजाने स्वीकारावा असा आदर्श विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी एकत्र येत स्वच्छता मोहिम राबवली.
केवळ कार्यक्रमापुरती स्वच्छता ही धारणा झुगारून स्वच्छतेला सामाजिक संस्कृतीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न प्रशंसनीय आहे.
निव्वळ घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कृती अधिक प्रभावी असते त्याचे दृश्य प्रतिबिंब येथे उमटले. स्थानिक नेतृत्वाचा सहभाग समाजशिक्षणाचा उत्तम नमुना या कार्यक्रमास गोपाल गावित जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना, सौ. चंद्रकला गावित अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, कल्पेश गावित ग्रामपंचायत सदस्य तसेच माता पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.



