*नंदुरबार शहर भारतीय जनता पार्टीतर्फे लोहपुरुष सरदार पटेल जयंतीनिमित्त अभिवादन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार शहर भारतीय जनता पार्टीतर्फे लोहपुरुष सरदार पटेल जयंतीनिमित्त अभिवादन*
*नंदुरबार शहर भारतीय जनता पार्टीतर्फे लोहपुरुष सरदार पटेल जयंतीनिमित्त अभिवादन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील नंदुरबार शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. नंदुरबार शहरातील हुतात्मा स्मारक याठिकाणी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन जयंतीनिमित्त नंदुरबार शहर भाजपातर्फे अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य पंकज पाठक, भाजपाचे जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी, भाजपाचे नंदुरबार शहराध्यक्ष नरेश कांकरिया, तालुकाध्यक्ष दीपक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मोहन खानवाणी, माणिक माळी, प्रशांत चौधरी, हेमंत कदम, भावेश गायकवाड, मोहन चौधरी, जगदीश श्रीवास्तव, अजहर काझी, पद्माबाई परदेशी, डॉ.नक्षणे आदी उपस्थित होते. भारताच्या एकीकरणाचे शिल्पकार व अखंड भारताचे प्रतीक असलेल्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रेरणादायी कार्यास वंदन करण्यात आले. एक भारत, श्रेष्ठ भारत या त्यांच्या विचारांचा वारसा जपत भारतीय जनता पार्टी सतत कार्यरत राहील, असे यावेळी सांगण्यात आले.



