*नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचा " केंद्रीय गृह मंत्री दक्षता पदक " देवुन सन्मान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचा " केंद्रीय गृह मंत्री दक्षता पदक " देवुन सन्मान*
*नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचा " केंद्रीय गृह मंत्री दक्षता पदक " देवुन सन्मान*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांना " केंद्रीय गृह मंत्री दक्षता पदक " बहाल करून सन्मानीत करण्यात आले. सेलु पोलीस ठाणे जिल्हा परभणी येथील गुन्हा रजि. क्र. 120/2021 भा.द.वि. कलम 304 (अ), 279, 427 प्रमाणे दाखल अपघातच्या गुन्ह्याचा तपास त्यांच्याकडे देण्यात आला होता. सदर गुन्हा हा प्रथमदर्शनी अपघाताचा असल्याचे दिसून येत होते. वैद्यकीय अधिकारी यांनी मरणाचे कारण देखील अपघात असल्याचे स्पष्ट केले होते. परंतू नमूद गुन्ह्याच्या तपासात पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांना मयताची पत्नी व सेलु येथील एका इसमा सोबत झालेले संभाषण सोशल मिडीयामध्ये व्हायरल झाले. त्यावरुन त्या दोघांमध्ये अनैतीक संबंध असल्याचा संशयावरुन गुन्ह्यातील साक्षीदार, परिस्थिती जन्य पुरावा व भौतीक पुरावे या आधारे त्यांनी मयताची पत्नी व संबंधीत इसम यांच्यातील एकमेकांशी असलेले अनैतीक संबंध निष्पन्न झाले व मयत हा त्यांच्या संबंधात अडथळा असल्याचे आरोपीला वाटायला लागले. त्यामुळे आरोपी याने त्याच्या इतर 3 साथीदारांच्या मदतीने खुनाचा कट रचुन अपघाताचा बनाव केला व मयतास ट्रकने ठोस मारून अपघात केला असा बनाव रचला, परंतू तो अपघात नसून खुन असल्याचे तपास अधिकारी यांनी निष्पन्न केले. त्यांनी त्याअनुषंगाने आपल्या तपासाचे चक्र फिरवले असता आरोपी विरुध्द खूनाचा गुन्हा निष्पन्न केला. त्यावरुन नमुद गुन्ह्यात भा.दं.वि. कलम 302, 120(ब), 201 प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले होते. नमूद गुन्ह्याचा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी कौशल्यपुर्वक तांत्रिक विश्लेषण, भरभक्कम पुराव्यासह तपास केल्याने गुन्ह्यातील आरोपीतास सश्रम कारावासाची दुहेरी जन्मठेप व द्रव्यदंडाची शिक्षा झाली त्यांच्या अश्या उत्कृष्ट कामगीरी बद्दल त्यांना "केद्रीय गृह मंत्री दक्षता पदक" बहाल करून सन्मानित करण्यात आले आहे.



