*"राष्ट्रीय एकता दिवस" निमित्ताने जिल्हा पोलीस दलातर्फे (Run For Unity) एकता दौडचे आयोजन, नागरिकांनी मोठ्या संख्येने एकता दौडमध्ये सहभागी व्हावे, नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस या
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*"राष्ट्रीय एकता दिवस" निमित्ताने जिल्हा पोलीस दलातर्फे (Run For Unity) एकता दौडचे आयोजन, नागरिकांनी मोठ्या संख्येने एकता दौडमध्ये सहभागी व्हावे, नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस या
*"राष्ट्रीय एकता दिवस" निमित्ताने जिल्हा पोलीस दलातर्फे (Run For Unity) एकता दौडचे आयोजन, नागरिकांनी मोठ्या संख्येने एकता दौडमध्ये सहभागी व्हावे, नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस यांचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचे 150 व्या जयंतीनिमित्त देशभरात "राष्ट्रीय एकता दिवस" साजरा करण्यात येणार असुन या निमित्ताने देशभरातील पोलीस ठाण्यांमध्ये "Run For Unity" एकता दौड आयोजित करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमात समाजातील सर्व घटकांनी सहभागी होऊन देशातील एकता, अखंडता व सुरक्षितता यांना बळकटी मिळावी आणि देशभक्तीची भावना दृढ करुन राष्ट्रीय एकात्मतेसाठी व्यापक जनजागृती करण्यासाठी "Run For Unity" एकता दौड हा कार्यक्रम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 31 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता सर्व पोलीस ठाणे कडून आपआपले हद्दीत घेण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाची सुरुवात जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता शपथ घेऊन करण्यात येणार असुन त्यानंतर एकता व अखंडतेचा संदेश देत जिल्हयाभरातील प्रत्येक पोलीस ठाणेचे हद्दीतील प्रमुख मार्गावरुन एकता दौड काढण्यात येणार आहे. "जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित "एकता दौड" कार्यक्रमासाठी नागरिकांनी 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता आपले नजीकच्या पोलीस ठाण्यात जाऊन जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा तसेच सदर दौडसाठी नागरिकांनी पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.



