*जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक -2025, मतदार यादी प्रसिद्धीच्या कार्यक्रमास 12 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ-प्रमोद भामरे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक -2025, मतदार यादी प्रसिद्धीच्या कार्यक्रमास 12 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ-प्रमोद भामरे*
*जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक -2025, मतदार यादी प्रसिद्धीच्या कार्यक्रमास 12 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ-प्रमोद भामरे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका 2025 साठी मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमास राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. या मुदतवाढीनुसार, अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय यादी प्रसिद्ध करण्यास 12 नोव्हेंबर, 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रमोद भामरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
विधानसभा मतदार याद्यांवरुन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकांकरीता प्रभाग निहाय मतदार याद्या अंतिम व अधिप्रमाणित करून 27 ऑक्टोंबर, 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होत्या. राज्य निवडणूक आयोग यांनी नवीन सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. या सुधारित कार्यक्रमानुसार 03 नाव्हेंबर, 2025 रोजी निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील मतदार याद्या अधिनियमाच्या कलम 13 खाली अधिप्रमाणित करण्यात येतील. व निवडणूक विभाग व निर्वाचक गणांच्या छापील मतदार याद्या माहितीसाठी सूचना प्रसिद्ध करण्यात येतील व 12 नोव्हेंबर, 2025 रोजी मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
नागरिकांनी/मतदारांनी राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या या मुदतवाढीची नोंद घ्यावी, असे आवाहनही उपजिल्हाधिकारी (महसूल) भामरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.