*52 वी राज्यस्तरीय ज्यूदो ज्युनियर्स स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*52 वी राज्यस्तरीय ज्यूदो ज्युनियर्स स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी*
*52 वी राज्यस्तरीय ज्यूदो ज्युनियर्स स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एस.ए. मिशन हायस्कूल (जिमखाना) येथे 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता जिल्हा निवड चाचणी चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य ज्यूदो असोसिएशन व जळगाव जिल्हा हौशी ज्यूदो संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 52 वी राज्य ज्यूदो ज्युनियर्स स्पर्धा व राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन दिनांक 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान जळगाव येथे करण्यात आले आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक असणाऱ्या खेळाडू मुला /मुलींनी निवड चाचणी स्पर्धेत जास्तीत जास्त सहभागी व्हावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा ज्यूदो असोसिएशनचे अध्यक्ष गणेश मराठे यांनी केले आहे. तरी इच्छुक खेळाडूंनी 17 ऑक्टोबर रोजी शनिवारी सायंकाळी ठीक. 5 वाजता उपस्थित राहावे. सोबत येताना जन्म दाखला, आधार कार्ड व पासपोर्ट फोटो आणावे खेळाडूंचे जन्म साल पुढील प्रमाणे 2005, 2006, 2007, 2008, 2009, 2010, असे असावे जिल्हा स्पर्धेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जळगाव येथे होणाऱ्या 52 वी राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. आणि जळगाव येथे विजयी झालेल्या खेळाडूंना दिनांक 27 ते 30 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे. याबद्दल अध्यक्ष गणेश मराठे यांनी कळविले आहे.