*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची टीईटी बाबत रिव्ह्यू पिटीशन(पुनर्विचार याचिका)अखेर बोर्डावर, कुणीही टीईटीच्या दडपणामध्ये टोकाचा निर्णय घेऊ नये-राज्याध्यक्ष खांडेकर*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची टीईटी बाबत रिव्ह्यू पिटीशन(पुनर्विचार याचिका)अखेर बोर्डावर, कुणीही टीईटीच्या दडपणामध्ये टोकाचा निर्णय घेऊ नये-राज्याध्यक्ष खांडेकर*
*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची टीईटी बाबत रिव्ह्यू पिटीशन(पुनर्विचार याचिका)अखेर बोर्डावर, कुणीही टीईटीच्या दडपणामध्ये टोकाचा निर्णय घेऊ नये-राज्याध्यक्ष खांडेकर*
नंदुरबार(प्रतिनिधी):-मागील अनेक दिवसांपासून शिक्षकांना परत एकदा टीईटी द्यावी लागणार अशा बातम्या समाज माध्यमातून फिरताना दिसत आहेत. टीईटीच्या या बातम्या मुळे अनेक शिक्षक बांधव मानसिक तणावामध्ये आहेत. यातच सिंधुदुर्ग मधील एका शिक्षक बांधवांनी स्वतःचे जीवन देखील संपवले. यावर तातडीची पावले उचलत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना पुढे सरसावली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वीतेश खांडेकर, राज्य सरचिटणीस गोविंद उगले, राज्यकार्याध्यक्ष आशुतोष चौधरी, प्राजक्त झावरे, राज्य सल्लागार सुनील दुधे, मीडिया प्रमुख विनायक चौथे, यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी टीईटी संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया प्रक्रियेची तात्काळ कारवाई करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यामध्ये पदवीधर आमदार एडवोकेट अभिजीत दादा वंजारी यांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली व याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेतर्फे रिव्ह्यू पिटिशन म्हणजेच पुनर्विचार याचिका दाखल करण्यात संघटनेला यश मिळाले आहे सदर पिटीशनचा केस डायरी नंबर 59344/2025 असा आहे. कोणीही मानसिक तणावांमध्ये येऊन कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नये. याद्वारे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेतर्फे समस्त राज्यातील सर्व शिक्षक बांधवांना विनम्र आवाहन करण्यात येते की कोणीही टीईटी संदर्भात कोणत्याही प्रकारचे मानसिक दडपण घेऊ नये मग कोणतीही टोकाचे पाऊल उचलू नये. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना खंबीरपणे आपल्या सर्वांसोबत आहे.