*मयत मोहीत राजपूतच्या परिवाराचे 14 ऑक्टोंबर पासून शहर पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मयत मोहीत राजपूतच्या परिवाराचे 14 ऑक्टोंबर पासून शहर पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण*
*मयत मोहीत राजपूतच्या परिवाराचे 14 ऑक्टोंबर पासून शहर पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण*
नंदूरबार(प्रतिनिधी):-मयत मोहित मदन राजपूतच्या हत्येच्या मारेकरीना अद्याप पावतो अटक झालेली नाही. सदर आरोपी मोकाट फिरत असून संबंधित तपासी अधिकाऱ्यांना व पोलीस प्रशासनाला आरोपी बद्दल माहिती असून देखील आजतागायत आरोपींना अटक होऊ शकली नाही, म्हणून मयत मोहित मदन राजपूत यांच्या पत्नी मोनिका मोहित राजपूत व वडील मदन हिरालाल राजपूत हे 14 ऑक्टोंबर मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार होते, परंतु मयत मोहित राजपूतचा परिवार शहर पोलीस स्टेशन नेहरू पुतळाजवळ आमरण उपोषणास बसणार आहे. या आमरण उपोषणा दरम्यान राजपूत परिवारास काही झाल्यास सर्वस्व जबाबदार पोलीस प्रशासनाची राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.