*महावितरण सारख्या पुरुषप्रधान क्षेत्रात ठसा उमटवणारी रूपाली बाचिम*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महावितरण सारख्या पुरुषप्रधान क्षेत्रात ठसा उमटवणारी रूपाली बाचिम*
*महावितरण सारख्या पुरुषप्रधान क्षेत्रात ठसा उमटवणारी रूपाली बाचिम*
संगमेश्वर(प्रतिनिधी):-नोकरीची काही क्षेत्रे परंपरागतपणे पुरुषप्रधान समजली जातात. त्यापैकी एक क्षेत्र म्हणजे महावितरण. पण या क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी मोडत स्वत:चे स्थान निर्माण करणारी आधुनिक नवदुर्गा म्हणजे करजुवे गावाची रूपाली बाचिम. करजुवे गाव हे दुर्गम गावं म्हणून समजले जाते. ह्या गावात दोन बहिणी आणि एक भावासह शिकून लहानाची मोठी झालेली रूपाली हीने महिलांना काहीसे अपरिचित असलेले आयटीआय हे क्षेत्र पुढील शिक्षणासाठी निवडले. शेती हा पारंपारिक उद्योग असलेले बाचिम कुटुंबियात रूपालीच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवल्यावर आईने शेती सांभाळत चार आपत्यांना वाढवले. ह्या चारांपैकी तिसरी रूपाली. घराची परिस्थिती समोर बघत असताना बारावीनंतर काय या प्रश्नाला चुलते मंगेश कांगाणे आणि अन्य एका नातेवाइकांनी आयटीआय करण्याचा सल्ला दिला आणि त्यासाठी इलेक्ट्रिशियन हा मार्ग दाखवला. प्रत्यक्षात ही वाट रूपालीसाठी वाटली तितकी सोपी नव्हती. संगमेश्वर येथील आयटीआयमध्ये प्रवेश घेतल्यावर लक्षात आले की इलेक्ट्रिशियनच्या कोर्सला अवघ्या चार मुली आहेत. पण त्याही परिस्थितील करजुवे ते संगमेश्वर असा प्रवास दोन वर्षे करत तिने तो कोर्स 71 टक्के गुण मिळवत पूर्ण केला. कोर्स पूर्ण झाल्यावर आरवली येथे वर्षभर कंत्राटी कर्मचारी म्हणून काम केले आणि अनुभव मिळवला. त्यानंतर शहरात जाण्याचा विचार सुरू असतानाच महावितरण मध्ये विद्युत सहाय्यक ह्या पदासाठीची जाहिरात रूपालीला समजली आणि तिने ऑनलाइन अर्ज केला. त्यानुसार आरवली कार्यालयातच तिची विद्युत सहाय्यक या पदावर नियुक्ती करण्यात आली. 2021 पासून रूपाली आरवली महावितरण अंतर्गत येणार्या धामापूरतर्फे संगमेश्वर ह्या गावात कार्यरत आहे.
महावितरणची बिले वसूल करणे, मीटर बसवणे, फ्यूज बदलणे अशी कामे ती करतेच पण पोलवर चढून पोलवरचे फॉल्ट काढणे, महावितरणच्या तारा ओढणे, एकमेकांना चिकटलेल्या तारा सोडवणे ही कामेही ती लीलया करते. या कामात तिला अधिकारी अमोल म्हस्के आणि लाईनमन संदेश पारधी यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळत असल्याचे सांगते. आपल्या कामामुळे रूपाली परिसरात खूप लोकप्रिय झाली आहे. वेळ आली की तातडीने धावून जाणे, रात्री अपरात्री, अडीअडचणीच्या ठिकाणी जावून काम करत ती ग्रामस्थांच्या समस्या सोडवते, अस्या या रुपाली बाचीम या नवं दुर्गेचे तालुक्यातून कौतुक होत आहे.