*IFAD प्रतिनिधींचा हरणखुरी दौरा, महिला सशक्तीकरण आणि परंपरेचा संगम पर्यावरण संवर्धनाचे आदर्श ठिकाण*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*IFAD प्रतिनिधींचा हरणखुरी दौरा, महिला सशक्तीकरण आणि परंपरेचा संगम पर्यावरण संवर्धनाचे आदर्श ठिकाण*
*IFAD प्रतिनिधींचा हरणखुरी दौरा, महिला सशक्तीकरण आणि परंपरेचा संगम पर्यावरण संवर्धनाचे आदर्श ठिकाण*
धडगाव(प्रतिनिधी):-IFAD प्रतिनिधींचा हरणखुरी दौरा – महिला सशक्तीकरण आणि परंपरेचा संगम पर्यावरण संवर्धनाचा आदर्श ठिकाण. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), नंदुरबार अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या महिला सक्षमीकरण व ग्रामीण विकास उपक्रमांची पाहणी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (IFAD - International Fund for Agricultural Development) चे प्रतिनिधी 8 आणि 9 ऑक्टोबर 2025 रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या प्रतिनिधी मंडळात केविन डॉलिंग (इटली), सौ. गायत्री महर (दिल्ली) आणि सौ. चित्रा सावंत (माविम मुख्यालय, मुंबई) यांचा समावेश होता. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, प्रतिनिधींनी धडगाव तालुक्यातील हरणखुरी या दुर्गम आदिवासी गावास भेट दिली. हे गाव गृप ग्रामपंचायत भुजगाव अंतर्गत येते. येथे पारंपरिक बीज बँकेची कार्यपद्धती जाणून घेतली असता, श्रीमती वसीबाई मोचडा पावरा यांनी सखोल माहिती दिली. पारंपरिक बियाण्यांचे जतन व संवर्धन यासाठी या महिलांनी घेतलेले पुढाकार आणि त्यामागची स्थानिक ज्ञानपरंपरा याचे प्रतिनिधींनी कौतुक केले. याच ठिकाणी एकलव्य महिला बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या जैविक खतांची पाहणी करण्यात आली. या जैविक पद्धतीने उत्पादित खताचा उपयोग स्थानिक शेतीत कसा होत आहे आणि पर्यावरणपूरक शेतीची संकल्पना कशी रूजते आहे, याची माहिती प्रतिनिधींनी घेतली. शेततळ्यांचे व्यवस्थापन, जलसंवर्धन, वृक्षलागवड अशा अनेक उपक्रमांची माहिती ग्रामस्थांनी दिली. या संदर्भात गृप ग्रामपंचायत भुजगावचे सरपंच अर्जुन पावरा म्हणाले, "हरणखुरी गावातील महिला बचत गटांच्या पुढाकाराने आणि माविमच्या मार्गदर्शनाखाली आज आमच्या गावात खूप सकारात्मक बदल घडले आहेत. पारंपरिक बियाण्यांचे जतन, जैविक शेती, वृक्षलागवड यामुळे केवळ आर्थिक नाही तर पर्यावरणीय फायदाही होत आहे. IFAD प्रतिनिधींनी गावाच्या कामगिरीची दखल घेतल्याने आम्हाला अधिक आत्मविश्वास मिळाला असून, हे सहकार्य भविष्यात अधिक व्यापक स्वरूप घेईल, अशी अपेक्षा आहे. ही सर्व विकासकामे माविमच्या पुढाकारातून, गृप ग्रामपंचायत भुजगाव, गाव विकास समिती आणि महिलांच्या स्वयंसहायता गटांच्या एकत्रित सहभागातून राबवली जात आहेत. त्यामुळे या परिसरातील महिलांनी केवळ आर्थिक स्वावलंबनच नाही, तर पर्यावरण संवर्धन व परंपरागत ज्ञानाच्या जपणुकीचाही ठोस आदर्श उभा केला आहे. या दौऱ्यात माविमचे नाशिक विभागीय सल्लागार, नंदुरबार जिल्हा कार्यालयाचे अधिकारी, CMRC व्यवस्थापक, लेखापाल व सहयोगिनी (फील्ड वर्कर) उपस्थित होते. IFAD प्रतिनिधींनी या उपक्रमांची प्रशंसा करत भविष्यातील सहकार्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. हरणखुरी गाव आणि गृप ग्रामपंचायत भुजगावचा हा अनुभव ग्रामीण विकासाच्या दिशेने उचललेले प्रेरणादायी पाऊल ठरला आहे.