*विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांनी एकलव्य विदयालयात हिंदी दिवस सपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांनी एकलव्य विदयालयात हिंदी दिवस सपन्न*
*विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांनी एकलव्य विदयालयात हिंदी दिवस सपन्न*
नंदूरबार(प्रतिनिधी):-14 सप्टेंबर हिंदी दिनाचे औचित्य साधून हिंदी दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. या वेळी विद्यालयातील जेष्ठ शिक्षक वसंत वसईकर, मिलिंद वडनगरे, धर्मेंद्र मराठे, टिका पाडवी, संतोष पाटील सुनिल पाटील, मेधा गायकवाड आदि मान्यवर तसेच विविध साहित्यकारांची भूमिका साकारणारे बालसाहित्यकार व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयातील हिंदी शिक्षक महेंद्र गिरासे यांनी केले. कार्यक्रमात संत मीराबाईंची भूमिका कु.रूतिका वसईकर, कबीरदासांची भूमिका विहांत ढोडरे, तुलसीदासांची भूमिका खुशल पाटील, रहीमदासांची भूमिका अनस पिंजारी या बाल साहित्यकारांनी साकारली व उपस्थितांची मने जिंकली. पलक नाईक, चंचल पवार, शिवेंद्र देवघरे, यांनी आपल्या मनोगतातुन आणि इयत्ता 7वी(फ) च्या विद्यार्थ्यांनींनी गीताच्या माध्यमातून तसेच इयत्ता 6 वी (फ) वर्गातील श्वेता ब्राम्हणे व सारिबा सय्यद यांनी संवादाच्या माध्यमातुन हिंदी भाषेचे महत्त्व स्पष्ट केले. भारतमातेची भूमिका जिया फातेमा शेख हिने साकारली. या कार्यक्रमात विद्यालयातील इ- 5 वी (ई) व (फ) च्या विद्यार्थ्यांनींनी बहारदार नृत्य आणि अभिनयाद्वारे कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका सौ. किरण रघुवंशी यांनी हिंदी भाषेचे जीवनातील स्थान व महत्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 'हिंदी पखवाडा' अंतर्गत राष्ट्रभाषा हिंदी प्रतियोगिता परीक्षेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यालयातील इ 9 वी क च्या विद्यार्थीनी सौदर्या साळुंके व श्रेया कुलकर्णी यांनी केले. उपस्थित सर्वांचे आभार अन्सार शेख यांनी मानले.