*एकलव्य विद्यालयात जागतिक ओझोन दिन साजरा करण्यात आला*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एकलव्य विद्यालयात जागतिक ओझोन दिन साजरा करण्यात आला*
*एकलव्य विद्यालयात जागतिक ओझोन दिन साजरा करण्यात आला*
नंदूरबार(प्रतिनिधी):-पृथ्वी आणि तिच्यावरील सजीव सृष्टी यासाठी ओझोनचे महत्व व त्याच्या अस्तित्वाला घातक ठरणाऱ्या कृतींची मानवाला जाणीव व्हावी म्हणून 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर एकलव्य विद्यालयात इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी ओझोन डिप्लिशन अँड इट्स इफेक्ट्स ही सुंदर नाटिका सादर केली तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी ओझोन डिप्लिशनवर आधारित भेटकार्ड मान्यवर व शिक्षकांना दिले. विज्ञान शिक्षक राकेश बागुल यांनी विद्यार्थ्यांना ओझोनचे रासायनिक स्वरूप, महत्त्व, त्याचे विघटन व परिणाम याविषयी माहिती दिली. याप्रसंगी विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सौ. सुहासिनी नटावदकर, ज्येष्ठ शिक्षक वसंत वसईकर, टिका पाडवी, धर्मेंद्र मराठे व सर्व विज्ञान शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल भावसार यांनी केले तर श्रीमती किरण रघुवंशी यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले.