*सत्यशोधक शेतकरी सभेचा तहसील कचेऱ्यांवर उलगुलान मोर्चा*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सत्यशोधक शेतकरी सभेचा तहसील कचेऱ्यांवर उलगुलान मोर्चा*
*सत्यशोधक शेतकरी सभेचा तहसील कचेऱ्यांवर उलगुलान मोर्चा*
नवापूर(प्रतिनिधी):–शेतकरी, आदिवासी व कामगार यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने जिल्ह्यात तसेच शेजारच्या भागात तहसील कचेऱ्यांवर उलगुलान मोर्चांचे आयोजन करण्यात आले आहे. सत्यशोधक शेतकरी सभेच्या नेत्यांनी सांगितले की, शासनाकडे वारंवार निवेदन देऊनही मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आता रस्त्यावर उतरून लढा देणे भाग पडले आहे.
प्रमुख मागण्या
नवापूरसह संपूर्ण नंदुरबार जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून सोयाबीन, मका, उडीद व इतर पिकांच्या नुकसानीची भरपाई द्यावी. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी. आदिवासी वनहक्क कायदा योग्यरीत्या अंमलात आणून कसत असलेल्या वनजमिनीचा 7/12 उतारा द्यावा, वन खात्याच्या दडपशाहीला आळा घालावा. जन सुरक्षा कायदा तात्काळ रद्द करावा. आदिवासी समाजात बंजारा, धनगर किंवा कोणत्याही इतर जातींचा समावेश करू नये. वन कायदा 2023 रद्द करावा. पेसा 17 संवर्गातील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी. कामोद-दापूर परिसरात आदिवासींच्या जमिनीत बेकायदेशीर शिरकाव करणाऱ्या मेघा इंजिनियर कंपनीसह इतर कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत.
MIDC अंतर्गत बेकायदेशीर जमिनी हडपणे थांबवावे व देवळफळी ते वासरवेल फाटा पर्यंत विना मोबदला अधिग्रहित जमिनीबाबत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. मोर्चांची वेळापत्रक
मंगळवार, 23 सप्टेंबर – सटाणा तहसील कार्यालय
बुधवार, 24 सप्टेंबर – धुळे तहसील कार्यालय
गुरुवार, 25 सप्टेंबर – साक्री तहसील कार्यालय
शुक्रवार, 26 सप्टेंबर – नवापूर तहसील कार्यालय
सोमवार, 29 सप्टेंबर – नंदुरबार तहसील कार्यालय
मंगळवार, 30 सप्टेंबर – कन्नड तहसील कार्यालय
बुधवार, 1 ऑक्टोबर – सिंदखेडा तहसील कार्यालय
सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने समस्त आदिवासी, शेतकरी, कामगार व कर्मचारी बांधवांना या उलगुलान मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.