*कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलिनीकरण होणे आवश्यक-श्रीकांत सावंत*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलिनीकरण होणे आवश्यक-श्रीकांत सावंत*
*कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलिनीकरण होणे आवश्यक-श्रीकांत सावंत*
मुंबई(प्रतिनिधी):-कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकर करणे आवश्यक आहे. त्यामुळे काश्मिर ते कन्याकुमारी रेल्वे वाहतूक अतिशय जलद गतीने होईल, मालवाहतूक सुद्धा जलद गतीने होईल, त्याच प्रमाणे सावंतवाडी रेल्वे टर्मिन्स लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे त्यामुळे कोकणात 12 महिने पर्यटन सुरू राहील राष्ट्रीय उत्पन्नात प्रचंड वाढ होईल रोजगार निर्मिती होऊन बेकारी कमी म्हणून कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण होणे आवश्यक आहे अशी मागणी श्रीकांत सावंत अध्यक्ष मानवता विकास परिषद यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व रेल्वे मंत्री यांच्याकडे केली आहे तसा ईमेलही पाठवला आहे. मोदी यांनी त्वरित कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलिनीकर करण्यासाठी संबंधित रेल्वे मंत्री, अधिकारी, राज्य सरकार यांच्याशी चर्चा करून कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलिनीकर करावे अशी विनंती केली आहे. त्यांनी मनावर घेतले तर नक्की दसऱ्याच्या मुहूर्तावर सहज शक्य होईल. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि रेल्वे मंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले असल्याचे मानवता विकास परिषद, अध्यक्ष रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी सांगितले आहे.