*जी. टी. पाटील महाविद्यालयात ‘जागतिक ओझोन दिन’ उत्साहात साजरा*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी. टी. पाटील महाविद्यालयात ‘जागतिक ओझोन दिन’ उत्साहात साजरा*
*जी. टी. पाटील महाविद्यालयात ‘जागतिक ओझोन दिन’ उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-16 सप्टेंबर 2025 रोजी जी. टी. पाटील महाविद्यालय नंदुरबार येथे भूगोल विभाग व आंतरिक गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक ओझोन दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एम. जे. रघुवंशी यांनी भूषविले. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. एन. एस. पवार, माजी विभागप्रमुख, भूगोल विभाग यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभागप्रमुख डॉ. एफ आर. खांडेकर यांनी केले. प्रमुख वक्ते डॉ. एन. एस. पवार यांनी ‘ओझोन थर व त्याचे पर्यावरणीय महत्त्व’ या विषयावर सविस्तर व्याख्यान केले. त्यांनी ओझोन थरामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीला होणारे संरक्षण, मानवी आरोग्यावर होणारे परिणाम, तसेच पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याची आवश्यकता यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी पर्यावरण संरक्षणासाठी लहान -मोठ्या पातळीवर सकारात्मक पावले उचलली, तर भविष्यातील पिढ्यांना सुरक्षित पर्यावरण मिळेल असे त्यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले.
प्राचार्य डॉ. एम. जे. रघुवंशी यांनी अध्यक्षीय समरोपात जागतिक ओझोन दिनाचे महत्त्व स्पष्ट करत सांगितले की, मानवी क्रियांमुळे निर्माण झालेल्या प्रदूषणामुळे ओझोन थराला मोठा धोका निर्माण झाला आहे. यावर सर्वांनी संवेदनशीलतेने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच महाविद्यालयात अशा शैक्षणिक व सामाजिक जाणीव निर्माण करणाऱ्या उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाईल असे सांगितले. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेऊन ‘ग्रीन कॅम्पस’ संकल्पना पुढे न्यावी, असे त्यांनी आवाहन केले. प्रसंगी भूगोल विभातील सेट परीक्षा जून-2025 यश मिळालेले विद्यार्थी समाधान पाटील, दीपक मोरे व ऋषिकेश पिंपळे यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थेचे समन्वयक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नंदुरबार तालुका विधायक समितीचे चे समन्वयक डॉ. एम एस रघुवंशी, IQAC समन्वयक डॉ. एम आर. पाटील, डॉ. आर आर देवरे, प्रा. मोईन शेख कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूगोल विभागातील डॉ. ए आर भुयार यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. एम बी पाटील यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भूगोल विभागातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विदयार्थ्यानी परिश्रम घेतले.