*नंदुरबार येथील सेंट मदर टेरेसा स्कूलमध्ये हिंदी दिवस साजरा*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथील सेंट मदर टेरेसा स्कूलमध्ये हिंदी दिवस साजरा*
*नंदुरबार येथील सेंट मदर टेरेसा स्कूलमध्ये हिंदी दिवस साजरा*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथील सेंट मदर टेरेसा स्कूलमध्ये हिंदी हा दिवस खूप उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी मुख्याध्यापिका शिल्पा वाणी, समन्वयिका पूजा मंदाना, राधिका दहेरा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या व्यवस्थापिका मीना शिरसाठ यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन करण्यात आले. यानंतर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी हिंदी भाषेवर आधारित गीतांवर नृत्य सादर केले, नाटिका प्रस्तुत केली. काही विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यकत केले. लहान बालगोपालांनी विविध साहित्यिकांची वेशभूषा करून माहिती सांगितली, जसे मीराबाई, तुलसीदास, कबीरदास, मुन्शी प्रेमचंद सूरदास, काही विद्यार्थ्यांनी कबीर दोहे गाऊन दाखविले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रीती फाळके यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.