ईद-ए-मिलाद व गणेश उत्सव निमित्त बादशा नगर पटेल वाडी द्वारकाधीश यंग सर्कल व सैय्यद जाकिर मिया जहागीरदार मित्र परिवारातर्फे भव्य सत्कार समारंभ संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
ईद-ए-मिलाद व गणेश उत्सव निमित्त बादशा नगर पटेल वाडी द्वारकाधीश यंग सर्कल व सैय्यद जाकिर मिया जहागीरदार मित्र परिवारातर्फे भव्य सत्कार समारंभ संपन्न*
*ईद-ए-मिलाद व गणेश उत्सव निमित्त बादशा नगर पटेल वाडी द्वारकाधीश यंग सर्कल व सैय्यद जाकिर मिया जहागीरदार मित्र परिवारातर्फे भव्य सत्कार समारंभ संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):- येथील बादशहा नगर पटेलवाडी येथे नंदुरबार जिल्ह्यात गणेशोत्सव व ईद- ए-मिलाद तसेच वर्षभरात साजरे होणारे सर्वसन अति उत्साहात व शांततेत पार पाडल्यामुळे पोलीस प्रशासनाचे भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सय्यद जाकीर मिया मुसा मिया जागीरदार माजी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक सेल नंदुरबार हे होते तसेच सत्कारमूर्ती व प्रमुख म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस हे उपस्थित होते. कार्यक्रमात नंदुरबारचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अशीत कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन, नंदुरबार शहराचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील, उपनगर पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर, नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड, नंदुरबार शहर वाहतूक शाखा उप पोलीस निरीक्षक जगदीश गावीत, विकास गुंजाळ, छगन चव्हाण, पीएसआय देशमुख, मौलाना जावेद, मौलाना मुशफिक आलम, परवेज खान करामत खान, आरिफ कमर, विजय यादव माळी, राजू इनामदार, मोहन माळी, जगन माळी, फिरोज मन्सुरी, पंडित माळी, मोहिनीराज राजपूत, तोसीस मिया पिरजादे, ॲड गणी, मुस्तफा, मालती वळवी, दिनेश माळी, माऊली, लियाकत शहीद बागबान, मौलाना जकरिया रहमानी, डॉक्टर जमील मंसूरी, अब्दुल सत्तार धोबी, उस्मान नाथांनी, फारूक, नगरसेवक फारुख मेमन, माजी नगरसेवक राजू मिस्तरी, बाकील मीया मुसा मिया जहागीरदार, युनूस खान करणखेडा, इसरार अहमद, खालिद, वाहिद, (गुड्डया भाई) अनिस, आबीद शेख जैनोद्दीन, आवेश मियां जहागीरदार, अल्तमश मियां जहागीरदार,
आदी मान्यवर उपस्थित होते. सैय्यद जाकीर मिया मुसा मिया जागीरदार यांच्या हस्ते मान्यवरांच्या सत्कार व सन्मान करण्यात आला, यावेळी अनेक वक्त्यांनी आपले आपले मनोगत व्यक्त केले पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, जसे सन यावर्षी उत्साहात पार पडले तसेच त्यापेक्षा जास्त उत्साहात येणाऱ्या वर्षात सर्व सण पार पडावे तसेच एसपी यांनी नंदुरबार जिल्ह्याचे सर्व जनतेचे गणेश मंडळांचे सीरत कमिटी सदस्यांचे शांतता कमिटी सदस पोलीस युवा मित्र व त्यांचे सोबत काम करणारे सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले, यावेळी आयोजक समितीकडून येणाऱ्या सर्व पाहुण्यांच्या सन्मानचिन्ह ट्रॉफी शॉल नारळ देऊन आभार मानण्यात आला तसेच ईद- ए- मिलाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करणाऱ्या तसेच विविध क्षेत्रात ईद- ए-मिलाद निमित्त कार्यक्रम करणाऱ्या शहरातील कमिट्यांचे सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आला तसेच पोलीस मित्र म्हणून काम पाहणारे सर्व मुलांच्याही ट्रॉफी देऊन यावेळी आयोजक समितीकडून सन्मान करण्यात आला, यावेळी बादशानगर पटेलवाडी व द्वारकाधीश युवा मित्र मंडळाकडून सामाजिक क्षेत्रात अति उत्तम काम करणारे सय्यद जाकीर मिया यांच्या सन्मानचिन्ह व शाल हार देऊन सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे आयोजक तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सय्यद जाकीर मुसा मिया जागीरदार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पोलीस प्रशासनाचे तसेच सर्व नंदुरबार करांचे आभार व्यक्त केले व पोलीस अधीक्षक यांना आश्वासन दिले की आम्ही आपल्या आदेशानुसार येणाऱ्या सण उत्सव साजरा करून दाखवू तसेच त्यांनी सर्व आलेल्या मान्यवरांचे व बंधू-भगिनी सगळ्यांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वीरित्या पार करण्याकरिता हाजी गफार मस्तान, बाबा मन्सुरी, अन्वर मंडप बाला, अदनान मेमन, मुस्तफा शेख, समीर बेलदार, नदीम शेख, गुड्डू पिंजारी, बिलाल मिया जहागीरदार, गोलू सिखलीकर, तोसिफ मिया जहागीरदार, अमजद, जुबेर पिंजारी, हुसेन, जावीद इनामदार, नासिर शाह, शोएब रवाडा, आरिफ शेख, हाजी पलंबर, नदीम शेख, मुस्तफा शेख, तसेच बादशानगर पटेल वाडी व द्वारकाधीश येथील युवकांनी परिश्रम घेतला,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सैय्यद अजहर मिया जहागीरदार यांनी केले.