*नंदुरबार येथे रविवारी 'इंग्लिश मीडियम पावसाने निरंकारी संत समागमाचे' आयोजन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथे रविवारी 'इंग्लिश मीडियम पावसाने निरंकारी संत समागमाचे' आयोजन*
*नंदुरबार येथे रविवारी 'इंग्लिश मीडियम पावसाने निरंकारी संत समागमाचे' आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथे रविवार दि.14 सप्टेंबर 2025 रोजी धुळे झोन स्तरीय 'इंग्लिश मीडियम निरंकारी संत समागमा'चे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविक भक्तांनी या संत संमेलनात सहभागी व्हावे असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे. निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व्ही. जी. राजपूत लॉन्स, जाणता राजा चौकाजवळ, नंदुरबार येथे रविवारी(ता.14) सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत इंग्रजी माध्यमाचा संत समागम होत असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई येथील ब्रह्मज्ञान प्रचारक श्री वीरेंद्र बाह्मणे जी हे असतील. या संत समागमात अनेक भाविकांतर्फे अध्यात्म, भक्ती, सद्गुरु व निरंकार प्रभू परमेश्वराविषयी आपल्या भावना इंग्रजी माध्यमातून व्यक्त करण्यात येतील. सत्संग समाप्तीनंतर लंगर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या अलौकिक कार्यक्रमात सर्व प्रभू प्रेमी भाविक सज्जनांनी उपस्थित राहून सद्गुरुचा आशीर्वाद प्राप्त करावा, असे आवाहन निरंकारी मंडळाचे धुळे झोन चे क्षेत्रिय प्रभारी हिरालालजी पाटील, निरंकारी सेवादलाचे जळगाव क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक सुशीलकुमार दारा व नंदुरबार शाखेचे मुखी पुंडलिक निकुंभे यांनी केले आहे. संत निरंकारी मंडळातर्फे अध्यात्मिक जागृतीसाठी विश्वस्तरीय, राज्यस्तरीय, प्रादेशिक क्षेत्रिय आणखी स्थानिकस्तरावर आध्यात्मिक निरंकारी संत संमेलनांच्या माध्यमातून मानव एकता, प्रेम- नम्रता, सहनशीलता व सदाचार या मानवीय गुणांच्या पुनर्स्थापनेसाठी प्रयत्न केले जातात. आध्यात्मिकते सोबतच मानव कल्याणासाठी रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड व संगोपन, जलस्रोत स्वच्छता, आपत्कालीन मदत, अन्नछत्र अशा विविध आघाड्यांवर सेवा कार्य केले जाते.