*काथर्दे खुर्दमध्ये थोर विभूतींच्या विचारांचा जागर, शाळेला 25 फोटो फ्रेम्स भेट विद्यार्थ्यांच्या मनामनात राष्ट्रप्रेम, समाजसेवा व संस्कारांचा नवा दीप प्रज्वलित*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*काथर्दे खुर्दमध्ये थोर विभूतींच्या विचारांचा जागर, शाळेला 25 फोटो फ्रेम्स भेट विद्यार्थ्यांच्या मनामनात राष्ट्रप्रेम, समाजसेवा व संस्कारांचा नवा दीप प्रज्वलित*
*काथर्दे खुर्दमध्ये थोर विभूतींच्या विचारांचा जागर, शाळेला 25 फोटो फ्रेम्स भेट विद्यार्थ्यांच्या मनामनात राष्ट्रप्रेम, समाजसेवा व संस्कारांचा नवा दीप प्रज्वलित*
नंदुरबार(प्रतिनिधी):-“आम्ही महापुरुषांच्या विचारांचे वारसदार... आम्हीच खरे या देशाचे शिल्पकार...” या प्रेरणादायी घोषणेला साजेसा उपक्रम काथर्दे खुर्द येथे राबविण्यात आला. भुमीपुत्र शेतकरी उत्पादक गट, काथर्दे खुर्द यांच्या वतीने शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा, काथर्दे खुर्द येथे थोर महापुरुषांचे 25 आकर्षक फोटो फ्रेम्स सप्रेम भेट देण्यात आल्या.
उपक्रमाचा हेतू या उपक्रमामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांच्या मनामनात राष्ट्रभक्ती, समाजहिताची जाणीव, परिश्रमाची जाण, नीतिमत्ता व समानतेचे संस्कार दृढ होतील, असा विश्वास शिक्षक व पालकांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांचा सहभाग कार्यक्रमावेळी शाळेतील लहानग्या विद्यार्थ्यांनी हातात थोर विभूतींचे फोटो धरून समाजहितासाठी कार्य करण्याचा दृढ निश्चय व्यक्त केला. शाळेच्या प्रांगणात साकारलेल्या या दृश्यामुळे वातावरण प्रेरणादायी झाले.
महापुरुषांचे दर्शन या फ्रेम्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, सरदार वल्लभभाई पटेल, राजर्षी शाहू महाराज, स्वामी विवेकानंद, तंट्या मामा भील, वीर एकलव्य, साने गुरुजी, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन, बिरसा मुंडा, ख्वाजा नाईक, सरस्वती माता, माता रमाई आंबेडकर, संविधान, आण्णाभाऊ साठे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, आदी थोर विभूतींचे फोटो समाविष्ट आहेत.
त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवणारा ठरेल, असे मान्यवरांनी नमूद केले. उपस्थित मान्यवर या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक भरत पावरा तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करून समाजासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. “विद्यार्थी हेच देशाचे भविष्य असून, त्यांच्यामध्ये संस्कारांचा पाया भक्कम व्हावा यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे,” असे प्रतिपादन मान्यवरांनी केले. भुमीपुत्र शेतकरी उत्पादक गटाचे कपिल पाटील, महेश पाटील, टिनु पाटील, तुषार पाटिल, कन्हैयालाल पाटिल, भुषण पाटील, सतीश पाटिल, किरण पाटील, सतीष पाटील यांचे समस्त गावकरी तसेच सामाजिक कार्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. गावातील माजी विद्यार्थी यांनी अशाप्रकारे सहकार्य करुन शाळेसाठी हातभार लावावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
याप्रसंगी उपस्थित मुख्याध्यापक भरत पावरा, जेष्ठ शिक्षक श्रीकांत वसईकर, महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार जिल्हा शहादा तालुकाध्यक्ष तुकाराम अलट, खेमा वसावे, अंगणवाडी सेविका संगीता पाडवी, रेखा पाटील इ.उपस्थित होते.