*खो-खो स्पर्धेत वैजाली वैभव विद्यालयाचा सलग तिसऱ्यांदा विजय*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*खो-खो स्पर्धेत वैजाली वैभव विद्यालयाचा सलग तिसऱ्यांदा विजय*
*खो-खो स्पर्धेत वैजाली वैभव विद्यालयाचा सलग तिसऱ्यांदा विजय*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहादा तालुक्यातील नाईक महाविद्यालयाच्या मैदानावर शासकीय स्तरावरील पावसाळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत 14, 17 व 19 वयोगटातील मुला-मुलींच्या खो-खो सामने उत्साहात पार पडले.
14 वर्षे वयोगटातील स्पर्धेत तब्बल 13 संघांनी सहभाग घेतला. या गटात वैभव विद्यालय, वैजाली येथील विद्यार्थ्यांनी आपल्या चमकदार खेळाच्या जोरावर पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध करत सलग तिसऱ्यांदा तालुकास्तरीय विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील कामगिरी एक नजर साखळी सामना विजय 1- 12 फरकाने, उपांत्य सामना विजय 0- 14 फरकाने, अंतिम सामना विजय 3- 13 फरकाने एकतर्फी विजय मिळवत संघाने आपली भक्कम तयारी आणि संघभावना सिध्द केली. संपूर्ण स्पर्धेत वैभव विद्यालयाने प्रतिस्पर्ध्यांना संधीच न देता सर्वांचे लक्ष वेधले. या यशामागे क्रीडाशिक्षक प्रशांत पाटील यांचे कसून प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे चेअरमन आ. चंद्रकांतजी रघुवंशी, उपाध्यक्ष मनोज रघुवंशी, कार्यालयीन अधीक्षक पुष्पेंद्रजी रघुवंशी, मुख्याध्यापक डी. एस. माळी सर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या तयारीत शिक्षक आणि शिक्षकेतर बंधूंचे अनमोल सहकार्य लाभले.
गेल्या तीन वर्षांपासून सलग तालुकास्तरीय विजेतेपद मिळवत वैभव विद्यालयाने आपल्या क्रीडा परंपरेला नवा उंचाव दिला आहे. या दमदार यशाबद्दल विद्यार्थी व प्रशिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत असून विद्यालयाने पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रात आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.