*31 ऑगस्ट"हा दिवस "भटके विमुक्त दिवस" म्हणुन साजरा करण्यास शासन निर्णय निर्गमित*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*31 ऑगस्ट"हा दिवस "भटके विमुक्त दिवस" म्हणुन साजरा करण्यास शासन निर्णय निर्गमित*
*31 ऑगस्ट"हा दिवस "भटके विमुक्त दिवस" म्हणुन साजरा करण्यास शासन निर्णय निर्गमित*
नंदूरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासन, इतर मागास बहुजन कल्याण, विभाग शासन निर्णय 31 जुलै 2025 अन्वये '31 ऑगस्ट" हा दिवस "भटके विमुक्त दिवस" म्हणुन साजरा करण्यास शासन निर्णय निर्गमित झालेला आहे.
सन 1871 साली ब्रिटिश सरकारने CRIMINAL TRIBES ACT अंतर्गत काही जातींना गुन्हेगार जाती म्हणुन घोषित केले. यामुळे या जातींमधील समाजबांधवांना स्वातंत्र्यपूर्व काळात अमानुष अत्याचार सहन करावा लागला. स्वातंत्र्यानंतरही हा समाज मुख्य प्रवाहापासुन दुर राहिल्याने भटक्या व विमुक्त समाजाला न्यायासाठी विलंब झाला. स्वातंत्र्यानंतर 31 ऑगस्ट 1952 रोजी CRIMINAL TRIBES ACT हा कायदा रद्द करण्यात आला आणि या जातींना विमुक्त जाती म्हणुन घोषित करण्यात आले. भटके विमुक्त समाज महाराष्ट्र राज्याच्या व देशाच्या प्रगतीमध्ये आपले योगदान देत आहेत. भटके विमुक्त समाजाचे स्वातंत्र्यातील व राष्ट्र उभारणातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या सन्मानार्य 31 ऑगस्ट" हा दिवस "भटके विमुक्त दिवस” साजरा करण्यात येत आहे.
तरी नंदुरबार जिल्हयात दिनांक "31 ऑगस्ट" 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, टोकरतलाव रोड, नंदुरबार ता. जि. नंदुरबार येथे ठिक 10 वा. "भटके विमुक्त दिवस" साजरा करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तरी नंदुरबार जिल्हयातील सर्वांना आवाहन करण्यात येते की, कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्व नागरिक, समाजातोल बांधव, विद्यार्थी, शिक्षक, समाजिक कार्यकर्ते व मान्यवर यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याबाबत सुंदरसिंग वसावे, सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, नंदुरबार यांनी आवाहन केले आहे.