*डी आर. हायस्कूल मध्ये सेवापूर्ती सोहळा संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डी आर. हायस्कूल मध्ये सेवापूर्ती सोहळा संपन्न*
*डी आर. हायस्कूल मध्ये सेवापूर्ती सोहळा संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील नं.ए.सो. संचलित श्रीमती डी.आर हायस्कूल मधील मुख्याध्यापक/प्राचार्य पंकज पाठक हे शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त झाले. याप्रसंगी त्यांना भावपूर्ण निरोप देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राहुल पाठक तर प्रमुख पाहुणे म्हणून गजानन डांगे, राष्ट्रीय अध्यक्ष योजक, सेंटर फॉर रिसर्च अँड स्टेटस प्लॅनिंग फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, नंदुरबार विधानसभेचे विद्यमान आमदार व माजी आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित, माजी खासदार हिना गावित व नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया गावित, भाजपा जिल्हा अध्यक्ष निलेश माळी व जिल्हा सरचिटणीस सदानंद रघुवंशी, संस्थेचे कार्याध्यक्ष नरेंद्र सराफ, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील सचिव प्रशांत पाठक, सत्कारार्थी पंकज पाठक व त्यांच्या सुविद्य पत्नी, उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक श्रीराम मोडक, पर्यवेक्षक संजय सैंदाणे, हेमंत खैरनार तसेच संस्थेतील सर्व शाखेतील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, उपप्राचार्य,वपर्यवेक्षक हे उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक पंकज पाठक यांनी सांगितले की, कश्याप्रकारे शिक्षक असताना त्यांनी विविध कार्यक्रमात सहभाग घेतला, कधीही राजकारणाचा उपयोग शाळेत केला नाही. नेहमी संस्थेचे संस्कार शिक्षक असताना आपल्या सोबत ठेवले. सर्वांना सोबत घेऊन प्रशासन सांभाळायचे असते, हे त्यांनी स्पष्ट केले, नेहमी आपण सकारात्मक विचारसरणी ठेवावी. तसेच माझ्या यशाच्या वाट्यात माझ्या पत्नीचा खूप मोठा सहभाग आहे हे त्यांनी सांगितले
अध्यक्षीय भाषणात राहुल पाठक यांनी आज पर्यंत अनुभवलेल्या मुख्याध्यापकांपैकी सर्वोत्कृष्ट मुख्याध्यापक म्हणजे पंकज पाठक आहे, असे गौरोद्गार यांच्या बद्दल व्यक्त केले
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ गजानन डांगे यांनी देशाच्या विकासाला बाधा आणणारी आव्हाने ही कोणती, कशाप्रकारे आपला भारत देश आपली संस्कृती विसरून पाश्चात्त्य संस्कृती चे अनुकरण करायला लागला त्यासाठी आपले प्राचीन विज्ञान पुन्हा स्थापित करण्याची वेळ आली आहे, भारतीयांचे भारतीयत्व परत मिळवण्याचा काळ आहे हे त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले. शिक्षक मनोगतातून शाळेचे पर्यवेक्षक हेमंत खैरनार व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक आशिष सोनार यांनी सरांच्या बालपणीचा आठवणींना व शालेय जीवनातल्या आठवणींना उजाळा दिला. तसेच सरांसोबत काम करताना आलेले अनुभव विषद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विक्रम परदेशी,प्रास्ताविक शाळेचे उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, मानपत्र वाचन सारंग बुवा, पाहुण्यांचा परिचय राहुल पाटील, तर आभार संस्थेचे सचिव प्रशांत पाठक यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.