*शासकीय आश्रम शाळा खडकी येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शासकीय आश्रम शाळा खडकी येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न*
*शासकीय आश्रम शाळा खडकी येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नवापूर तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा, खडकी येथे श्रावणी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या परिषदेचे उद्घाटन केंद्रप्रमुख निंबा पाकळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच शासकीय माध्यमिक आश्रमशाळा खडकीचे मुख्याध्यापक शशिकांत वसावे, अधीक्षक अरविंद पवार, अधिक्षिका सौ. सुरेखा ठाकरे, ढोंग सागाळी शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक पाऊल गावित, शिक्षकवृंदातील सौ. मनीषा कोकणी, सौ. सावित्री गावित, सौ. चारुशीला मोहिते, सुनील कोकणी, सोमवेल वळवी, मनुवेल वळवी, सोनिक गावित आदी मान्यवर उपस्थित होते. परिषदेतील चर्चिलेले विषय शिक्षण परिषदेत जिल्हास्तरावरून प्राप्त झालेल्या पीपीटीच्या आधारे विविध शैक्षणिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षणाचा आढावा व गुणवत्तावाढ या संदर्भात केंद्रप्रमुख निंबा पाकळे यांनी मार्गदर्शन केले. अध्ययन निष्पत्तीआधारित आदर्श पाठ सादरीकरण (गणित विषय) या उपक्रमात सीआरजी सदस्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करून सर्व शिक्षकांसोबत चर्चा घडवून आणली. कर्मयोगी भारत वेब पोर्टल रजिस्ट्रेशन या विषयावर धिरज खैरनार यांनी जिल्हास्तरावरून देण्यात आलेल्या पीपीटीच्या आधारे सविस्तर मार्गदर्शन केले. पालक परिषद व शैक्षणिक ग्रामसभा प्रक्रिया या विषयावर बकाराम सुर्यवंशी यांनी सादरीकरण केले. माझा वर्ग माझे नियोजन या विषयावर सौ. क्रांती सोनवणे यांनी गटकार्याद्वारे शिक्षकांना नियोजन तयार करण्यास प्रवृत्त केले. केंद्राच्या शैक्षणिक गरजा, नियोजन व अंमलबजावणी या विषयावर केंद्रप्रमुख निंबा पाकळे यांनी सविस्तर चर्चा करून शिक्षकांना दिशा दिली. शंका- निरसन व प्रशासकीय सूचना परिषदेतील सर्व विषयांवर झालेल्या चर्चेनंतर शिक्षकांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केंद्रप्रमुख पाकळे यांनी केले. त्यानंतर त्यांनी आवश्यक प्रशासकीय सूचना दिल्या. विशेषत: ऑनलाईन लिंक भरावयाची असल्यास ती फक्त केंद्रप्रमुखांनीच पूर्ण करावी, असे स्पष्ट करण्यात आले. विशेष सत्कार “हर घर तिरंगा” या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीत उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल हरणमाळ शाळेचे शिक्षक तथा सीआरटी स्वयंसेवक गोपाल गावित यांचा केंद्रप्रमुख निंबा पाकळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. या सत्काराने कार्यक्रमास विशेष उंची प्राप्त झाली. परिषदेचा निष्कर्ष या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांना अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी नवीन दिशा मिळाली. गुणवत्तावाढ, नियोजन व पालक- समुदाय सहभाग या घटकांचा शालेय शिक्षणावर कसा परिणाम होतो याविषयी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन झाले.